अहमदनगर : अक्षर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा निकाल जाहीर

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – येथील अक्षर विचार प्रतिष्ठान या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या संस्थेच्यावतीने दि.१९ ते २२ डिसेंबर दरम्यान अक्षर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचा दिमाखदार पारितोषिक वितरण सोहळा माऊली सभागृह, अहमदनगर. येथे उत्साह पुर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप हे होते.
प्रमुख पाहुणे म्हणुन फक्त मराठी टी.व्ही.चॅनलचे प्रमुख- श्याम मळेकर, सिने-नाट्य-मालिका दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले, माऊली सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र धामणे, ए वन बायोटेक चे दिलीप जाधव, कोरोना ग्रीन चे ऋषिकेश जाधव हे उपस्थित होते. अक्षर विचार प्रतिष्ठानचे अध्यक्ष बलभीम पठारे, अनुराग मंदाडे, मयुर करंजे यांनी मान्यवरांचे सत्कार केले. स्पर्धेचे परिक्षक प्रशांत हिरे (नाशिक ), सलीम शेख (नागपुर ), प्रताप सोनाळे (सांगली) यांचा सत्कार अक्षर करंडकचे स्पर्धा प्रमुख रितेश साळुंके, ऋषिकेश पठारे, सुरेश वड्डेपेल्ली यांनी केले. नाटयक्षेत्रातील आपल्या योगदानाबद्दल जेष्ठ नाटयकर्मी दिपक घारु यांना अक्षर परिवाराच्या वतीने यावर्षीचा अक्षर रंगयोगी पुरस्कार मान्यवरांच्या वतीने प्रदान करण्यात आला. सामाजिक क्षेत्रातील आपल्या बहुमूल्य योगदानाबद्दल माऊली सेवा प्रतिष्ठान आणि अक्षर परिवाराच्या वतीने स्नेहालय या संस्थेस यावर्षीचा कर्मयोगी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. स्नेहालयाच्या वतीने गिरीश कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्विकारला. याप्रसंगी तिस्ता बाथ सोप ॲड हेअर ऑईल या दोन प्रोडक्टसचे लोगो चे अनावरण ही मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी पायल पठारे यांनी प्रोडक्टस बद्दल माहिती दिली.

अक्षर करंडक मधुन मराठी चित्रपट सुर्ष्टीला आणि मालिका माध्यमाना अनेक नवोदित चेहरे मिळाले. अक्षरने उपलब्ध करुन दिलेला रंगमंच हा नवोदित कलावंतांसाठी पर्वणीच आहे, अशा शब्दात श्रीरंग गोडबोले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. फक्त मराठीवर नव्याने येणाऱ्या दोन मराठी मालिकांमध्ये अक्षर करंडक स्पर्धेतील कलावंताना आम्ही संधी देणार असल्याचे आश्वासन फक्त मराठी चॅनल हेड श्याम मळेकर यांनी दिले.आ.संग्राम जगताप यांनी अक्षर परिवाराच्या कार्याचे याप्रसंगी मनसोक्त कौतुक आपल्या भाषणातुन केले.  पुरस्कार प्राप्त दिपक घारु आणि गिरिश कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतातुन संस्थेचे आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन निवेदक प्रसाद बेडेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन अक्षरच्या वतीने कल्याणी निमसे यांनी केले.

स्पर्धा-महोत्सव यशस्वीततेसाठी  गंगाधर निमसे, रोहन पठारे, नानाभाऊ मोरे, विशाल दाभाडे, विवेक पंडित, प्रा.अशोक सागडे, अमोल खोले, पी.डी.कुलकर्णी, देविदास हिरे, प्रशांत जठार, शेखर वाघ, चाणक्य मंदाडे, आदित्य मंदाडे, प्रवीण रच्चा, सौरभ धोत्रे,  अभिजित निमसे, सागर गाडेकर, रोहित जाधव, सॅम जेऊरकर, आकाश ग्रोव्हर, राकेश पडगे, श्रीनिवास वड्डेपेल्ली, महेश सुराणा, गणेश लिमकर, ऋतूध्वज कुलकर्णी, गणेश मोरे, राजू येमूल, अमोल चोपडे, अक्षय मुनोत, नितेश कटारिया,  सौ.धनश्री खोले, सौ.वृषाली पठारे – मंदाडे, सौ.क्रांती निमसे, सौ.पायल पठारे, सौ.संध्या शिरसुल, सौ. सपना साळूंके, प्रमोद गुंजाळ, किरण धुमाळ, संदेश नेटके, सचिन वेळापुरे, राहुल वड्डेपेल्ली, ऋषिराज वड्डेपेल्ली, मल्लेशाम बिर्रू, वैभव सावंत, राजकुमार, मुन्ना सय्यद, यांनी परिश्रम घेतले. वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, छायाचित्रकार, ईलेक्ट्रॉनिक मिडियाचे प्रतिनिधी, स्पर्धक संघाचे नाटयकर्मी आणि नगरकर नाटय रसिकांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या शुभहस्ते अक्षर करंडक पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे-

सांघिक पारितोषिके –
प्रथम क्रमांक – कुणीतरी पाहिलं हवं – BMCC, पुणे (अक्षर करंडक व रोख रु.२५०००/-)                       व्दितीय क्रमांक – बिनविरोध – रंगपंढरी, पुणे (अक्षर करंडक व रोख रु.२००००/-)
तृतीय क्रमांक – रंगबावरी – नाट्यमल्हार, अहमदनगर (अक्षर करंडक व रोख रु.१५०००/-)
उत्तेजनार्थ – रांगणाऱ्या माणसाचं रहस्य – आमचे आम्ही, पुणे (अक्षर करंडक व रोख रु.५०००/-)
उत्तेजनार्थ – रोल. कॅमेरा. ऑर्डर – THE ARTICULATE THESPIANS, पुणे (अक्षर करंडक व रोख रु.५०००/-)

दिग्दर्शन पारितोषिके –
प्रथम क्रमांक – योगेश सप्रे / हिमांशू बोरकर – कुणीतरी पाहिलं हवं – BMCC, पुणे (सन्मान चिन्ह व रोख रु.२१००/-)
व्दितीय क्रमांक  – तारा आराध्य – बिनविरोध – रंगपंढरी, पुणे (सन्मान चिन्ह व रोख रु.१५००/- )               तृतीय क्रमांक – संदीप दंडवते – रंगबावरी – नाट्यमल्हार, अहमदनगर (सन्मान चिन्ह व रोख रु.१०००/-)

अभिनय (पुरुष) पारितोषिके –
प्रथम क्रमांक – मनोज डाळिंबकर – रांगणाऱ्या माणसाचं रहस्य – आमचे आम्ही, पुणे (सन्मान चिन्ह व रोख रु.१०००/-)
व्दितीय क्रमांक – ज्ञानेश विधाते / महेश गावडे – बिनविरोध – रंगपंढरी, पुणे (सन्मान चिन्ह व रोख रु.७५०/-)
तृतीय क्रमांक – सर्व कलाकार (BACK कौन मारा) – VDM स्टुडिओ, अहमदनगर  (सन्मान चिन्ह व रोख रु.५००/-)

अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र –
स्तिमित साने – कुणीतरी पाहिलं हवं – BMCC, पुणे (सन्मान चिन्ह)
सुनील शेळके – रंगबावरी – नाट्यमल्हार, अहमदनगर (सन्मान चिन्ह)
सागर भंडगर – हलगी सम्राट – नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव  (सन्मान चिन्ह)
ऋषिकेश जाधव – EXPIRY DATE – राजारामबापू इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजि, इस्लामपूर (सन्मान चिन्ह)
प्रसाद दाणी – माझ्या नव-याची अॅलेक्सा – दिशा थिएटर, ठाणे (सन्मान चिन्ह)
अभिनय (स्त्री) पारितोषिके
प्रथम क्रमांक – अश्विनी अंचवले –  रंगबावरी – नाट्यमल्हार, अहमदनगरसन्मान चिन्ह व रोख रु.१०००/-

व्दितीय क्रमांक – वैष्णवी शेटे – हिरवीन – नवभारत शिक्षण मंडळ, सांगली सन्मान चिन्ह व रोख रु.७५०/- तृतीय क्रमांक – उन्नती कांबळे –  बिनविरोध – रंगपंढरी, पुणे सन्मान चिन्ह व रोख रु.५००/-

अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र –
शिवानी नाईक – रंगबावरी – नाट्यमल्हार, अहमदनगरसन्मान चिन्ह

प्रणाली पाटील – EXPIRY DATE – राजारामबापू इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजि, इस्लामपूर सन्मान चिन्ह
समृद्धी देशपांडे – रोल. कॅमेरा. ऑर्डर – THE ARTICULATE THESPIANS, पुणेसन्मान चिन्ह
मुग्धा थोरात – संगीत “या ठिकाणी त्या ठिकाणी” – एच्. पी. टी. आर्टस् आणि आर्. वाय्. के. सायन्स महाविद्यालय, नाशिक
साक्षी गायकवाड – BUT BEFORE LEAVE – सौंदर्य निर्मिती थिएटर, नाशिक सन्मान चिन्ह

प्रकाश योजना पारितोषिके –
प्रथम क्रमांक – राजेश शिंदे – भ्रमरात्र – स्वामी नाट्यांगण, डोंबिवली (सन्मान चिन्ह व रोख रु.१०००/-)
व्दितीय क्रमांक – निखिल मारणे – रांगणाऱ्या माणसाचं रहस्य – आमचे आम्ही, पुणे (सन्मान चिन्ह व रोख रु.५००/-)

नेपथ्य पारितोषिके –
प्रथम क्रमांक – राहुल मंदार – भ्रमरात्र – स्वामी नाट्यांगण, डोंबिवली (सन्मान चिन्ह व रोख रु.१०००/-)
व्दितीय क्रमांक – कविता निकाळजे – बिनविरोध – रंगपंढरी, पुणे (सन्मान चिन्ह व रोख रु.५००/-)
संगीत पारितोषिके

प्रथम क्रमांक – योगेश सप्रे/तन्मय भागवत/क्षितिज भट – कुणीतरी पाहिलं हवं – BMCC, पुणे (सन्मान चिन्ह व रोख रु.१०००/-
व्दितीय क्रमांक – रितेश डेंगळे – रंगबावरी – नाट्यमल्हार, अहमदनगर (सन्मान चिन्ह व रोख रु.५००/-)

रंग-वेशभूषा पारितोषिके –
प्रथम क्रमांक – निकिता जाधव /साक्षी मुकादम – कुणीतरी पाहिलं हवं – BMCC, पुणे (सन्मान चिन्ह व रोख रु.१०००/-)
व्दितीय क्रमांक – बिनविरोध – रंगपंढरी, पुणे (सन्मान चिन्ह व रोख रु.५००/-)

सर्वोत्कृष्ठ लेखन –
प्रथम क्रमांक – संदेश पवार – रोल. कॅमेरा. ऑर्डर – THE ARTICULATE THESPIANS, पुणे(सन्मान चिन्ह व रोख रु.१०००/-)

व्दितीय क्रमांक – योगेश सप्रे / रश्मी घन – कुणीतरी पाहिलं हवं – BMCC, पुणे (सन्मान चिन्ह व रोख रु.५००/-)
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/