वर्षभरात साईचरणी तब्बल 287 कोटींहून अधिक रक्कमेचं ‘दान’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शिर्डी साई समाधी मंदिराच्या देणगीत दोन कोटींनी वाढ झाली आहे. यंदाच्या वर्षी साई चरणी जवळपास 287 कोटीहून अधिक रक्कमेचे दान प्राप्त झाले. विशेष म्हणजे ऑनलाइन, डेबिट, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या देणग्याही वाढल्या आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत 2019 या वर्षात यंदा साई चरणी दोन कोटींची देणगी जमा झाली आहे.

साई संस्थानचे आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च आहे. परंतु त्यामुळे जानेवारी ते डिसेंबर या कॅलेंडर वर्षात साई संस्थानला किती दान आले याची उत्सुकता सर्वांना आहे. 2018 मध्ये साई चरणी 285 कोटी रुपयांचे दान आले. परंतु यंदा त्यात वाढ झाली असून 2019 मध्ये साई चरणी 287 कोटी 6 लाख 85 हजार 415 रुपये दान आले. शिवाय 19 किलो सोनं आणि 391 किलो चांदी प्राप्त झाली.

या वर्षी परकीय चलन आणि ऑनलाइन, डेबिट – क्रेडिट कार्डच्या माध्यमातून जी देणगी प्राप्त झाली ती मागील वर्षापेक्षा जास्त आहे असे शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले.

देणगीचे स्वरुप –
जानेवारी 2019 पासून ते 27 डिसेंबर 2019 पर्यंत
– दक्षिणापेटी 156 कोटी 49 लाख 2 हजार 350
– देगणी काऊंटर – 60 कोटी 84 लाख 8 हजार 590
– चेक डीडीद्वारे – 23 कोटी 35 लाख 90 हजार 409
– मनिऑडर – 2 कोटी 17 लाख 83 हजार 515
– डेबिट – क्रेडिट कार्डद्वारे – 17 कोटी 59 लाख 11 हजार 424
– ऑनलाइन देणगी – 16 कोटी 2 लाख 51 हजार 606
– परकीय चलन – 10 कोटी 58 लाख 37 हजार 521

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/