भारताला मिळालं पहिलं-वहिलं ‘राफेल’, वायुसेनेच्या उपप्रमुखांनी घेतली ‘भरारी’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पहिले राफेल लढाऊ विमान फ्रान्सने भारतीय हवाई दलाकडे सोपविला आहे. हवाई दलाचे उप – प्रमुख चीफ एअर मार्शल व्ही.आर. चौधरी यांनी विमानात सुमारे एक तासभर उड्डाण केले. भारतीय हवाई दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी फ्रान्सने पहिले राफेल विमान भारताला दिले. या राफेल विमानाचा टेल क्रमांक RB-01 असा आहे, जे भारतीय वायुसेनेचे भावी मुख्य एअर मार्शल राकेश कुमारसिंग भदौरिया यांचे नाव दर्शवत आहे.

भदौरिया यांनी या आधीही राफेल फायटर जेट उडवले आहे. भारतीय वायू सेनेतील ते पहिले एअर चीफ मार्शल आहेत ज्यांनी राफेल उडवले आहे. त्यांना गुरुवारी वायुसेनेच्या मुख्य अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. ते एयर चीफ मार्शल बीएस धनोआ यांची जागा घेणार आहेत. धनोआ ३० सप्टेंबर रोजी आपल्या पदावरून निवृत्त होणार आहेत. एयर मार्शल भदौरिया 26  प्रकारचे फाइटर आणि ट्रांसपोर्ट एयरक्राफ्ट उडवण्यात पारंगत आहेत. त्यांना 4250  तास फायटर विमान उडवण्याचा अनुभव आहे.

लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त चर्चेत होता राफेल मुद्दा
गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस राफेल फायटर विमानाचा मुद्दा खूप चर्चा विषय बनला होता. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने सत्ताधारी भाजप वर राफेल विमान खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप केला होता. या वरून राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधत जोरदार आक्रमण केले होते.

भारतात राफेल बाबतची तयारी वायुसेनेकडून करण्यात येत आहे. वायुसेना आपल्या ‘गोल्डन ऐरोज’ 17 पुन्हा सुरु करण्याच्या तयारीत आहे. ही राफेल विमान उडवणारी पहिली तुकडी असेल.

visit : Policenama.com