‘या’ एअर होस्टेसनं 1 कोटीचं सोनं अंतर्वस्त्रात ‘लपवलं’, विमानतळावर उतराच ‘सापडलं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई विमानतळावर सोन्याची तस्करी करणार्‍या एअर होस्टेसला अटक करण्यात आली आहे. एअर होस्टेसने तब्बल 1 कोटींचे सोने बॅगमध्ये अंतर्वस्रात लपवून आणले होते. आरोपी एअर होस्टेस दुबईहून मुंबई येथे आली होती.

शनिवारी दुबईहून खासगी विमान मुंबई विमानतळावर दाखल झाले. एअर होस्टेसच्या बॅगमधून सुमारे 4 किलो सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बाजारात त्याचे मूल्य सुमारे एक कोटी रुपये आहे. एअर होस्टेसने तिच्या अंतर्वस्रातमध्ये बॅगच्या आत सोने लपवून ठेवले होते. एअर होस्टेस हे सोने अवैधरित्या बॅगमध्ये लपवून पळून जाण्याच्या प्रयत्नात होती. मात्र अधिकाऱ्यांना तिचे वागणे संशयास्पद आढळले. संशय आल्याने अधिकाऱ्यांनी तिची चौकशी केली. त्यात ही माहिती उघडकीस आली. पोलिसांनी तिला अटक केली

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बॅगची झडती घेतल्यानंतर अंतर्वस्रांमध्ये सोने लपवलेले आढळले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी एअर होस्टेसला अटक केली. चौकशी दरम्यान आरोपीने पोलिसांना सांगितले की, दुबईतील एका व्यक्तीने त्याला या कामासाठी 60 हजार रुपये देण्याचे कबूल केले होते. पोलिस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत .

 

Visit  :Policenama.com