×
Homeउस्मानाबादAjit Pawar | कार्यकर्त्याची चिठ्ठी वाचून अजित पवारांनी लावला डोक्याला हात, खोचकपणे...

Ajit Pawar | कार्यकर्त्याची चिठ्ठी वाचून अजित पवारांनी लावला डोक्याला हात, खोचकपणे म्हणाले – अरे मग तेच सांगतोय ना शहाण्या, आमदार पाडा आणि…

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | बारामती (Baramati), माढात (Madha) ज्या प्रमाणे विकास झाला तसा उस्मानाबादचा (Osmanabad) विकास करा, असा मजकुर लिहिलेली चिठ्ठी एका कार्यकर्त्याने भाषण सुरू असताना अजित पवारांना (Ajit Pawar) पाठवली. ते वाचल्यानंतर अजित पवारांनी कार्यकर्त्यालाच खोचकपणे म्हणाले, आमदार पाडा आणि विकास करा. ते आज उस्मानाबादमध्ये एस. पी. साखर कारखान्याच्या (S. P. Sugar Factory) गळीत हंगाम उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

 

शेतकरी (Farmer) जीवंत राहिला, तर पक्ष 100 टक्के जीवंत राहतो. शेतकरी सक्षम करण्यासाठी पाणी महत्त्वाचे आहे. 150 आमदारच का, 288 का नाही? तसेच सोयाबीनच्या भावाबाबत सुद्धा कार्यकर्त्याने चिठ्ठीत विचारणा केली होती. यावर अजित पवार म्हणाले, अरे मग तेच सांगतोय ना शहाण्या. बरं झालं याने सांगितलं.

 

अजित पवार पुढे म्हणाले, शरद पवार (Sharad Pawar) 10 वर्षे कृषीमंत्री (Agriculture Minister) असताना राष्ट्रीय फलोत्पादन योजना त्यांनी आणली. देशातील शेतकर्‍यांचे 72 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. कांद्याचे दर पडले तेव्हा शरद पवारांनी निर्यातबंदी उठवली आणि कांदा निर्यात करून चांगला भाव मिळवून दिला. सगळ्यांना आधारभूत किंमत, विद्यापीठे दिली.

 

अजित पवार म्हणाले, केंद्रीय कृषीमंत्रालयात फिरा, ते आजही म्हणतात की, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून
आजपर्यंत जेवढे कृषीमंत्री झाले त्यात शेतकर्‍यांबद्दल बारकाईने जाण असलेला एकच कृषीमंत्री झाला आणि तो म्हणजे शरद पवार.

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar answer sarcastically on question of worker in osmanabad marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | चिठ्ठी आयी है, आयी है…भाषण सुरू असतानाच अजितदादा गुणगुणले गाणं, कार्यकर्त्यांमध्ये हास्यकल्लोळ!

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई, 5 लाखाचा भेसळयुक्त गुळ व साखर जप्त

Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी पुन्हा राज्याव्यापी आंदोलन करू, मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक, सरकारला इशारा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News