Ajit Pawar | ‘गिन गिन के, चुन चुन के मारेंगे… बाकीच्यांनी काय बांगड्या भरल्यात का?’ अजित पवारांनी शिंदे गटाच्या आमदारांना धरले धारेवर (व्हिडिओ)

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार सदा सरवणकर (MLA Sada Saravankar) यांनी गोळीबार (Firing) केल्याचा प्रकार समोर आला होता. यावरून विरोधकांनी राज्य सरकारला (State Government) चांगलेच धारेवर धरले होते. अखेर सरवणकर यांच्या गुन्हा (FIR) दाखल करुन त्यांचे पिस्टल जप्त (Pistol Seized) केले. यानंतर विरोधकांवर टीका करताना सत्ताधारी आमदारांकडून काही वादग्रस्त वक्तव्य करण्यात आली. यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सत्ताधाऱ्यांचे कान टोचले आहेत. बीडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी (Ajit Pawar) सत्ताधाऱ्यांना, विशेषत: शिंदे गटाच्या आमदारांना धारेवर धरलं.

 

खोक्यानं जमलं म्हणजे सगळे जमत नाही
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta-Foxconn project) राज्याबाहेर जाण्याला महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) जबाबदार असल्याचा आरोप करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. 15 जुलै रोजी नव्या सरकारच्या काळात झालेल्या बैठकीत या प्रकल्पावर सविस्तर चर्चा झाली होती, असे सांगताना त्यांनी सरकारवर निशाणा साधला. आता म्हणतात मागच्या सरकारनं केलं. अरे मागच्या सरकारनं केलं हे काय सांगताय तोंड वर करुन? 15 जुलैची मीटिंग झाल्याचं समोर आहे. काहीही बोलता काय? खोक्यानं जमलं म्हणजे सगळंच जमत नसतं. महाराष्ट्रातल्या तरुणांनी तर पेटू उठलं पाहिजे, असे पवार म्हणाले.

 

हे तर आक्रतिच झालं
सत्ताधारी आमदारांनी केलेल्या विधानांचा यावेळी अजित पवारांनी चांगलाच समाचार घेतला. गेल्या तीन महिन्यांत कायदा-सुव्यवस्था (Law and Order) ढासळली आहे. सत्ताधारी पक्षाचेच आमदार मुंबईत गोळीबार करत आहेत. सरकारमधले आमदारच गोळीबार करत असतील तर जनतेनं न्याय मागायचा कोणाकडे? हे तर आक्रितच झालं.

 

अरे काय तुझ्या बापाच्या…
अजित पवार पुढे म्हणाले, कोण चुकीचं वागत असेल, तर त्यांना शासन केलं गेलं पाहिजे. पण तसं होत नाही.
गोळीबार केला जातो. त्यांचे लोक शिवीगाळ करतात, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का?
काही तर आमदार हात-पाय तोडण्याची भाषा करतात. त्यांच्या मेळाव्यात आमदारानं सांगितलं विरोधकांचे हात-पाय तोडा.
कुणी तुमच्याकडे आलं तर मी उभा आहे. अरे काय तुझ्या बापाच्या घरचं आहे का? तुम्ही असं कसं बोलू शकता?
असा परखड सवाल अजित पवारांनी उपस्थित केला. काही आमदार म्हणतात गिन गिन के, चुन चुन के मारेंगे… कोण कुणाला मारतंय, कोण कुणाला काय करतंय आणि बाकीच्यांनी काय बांगड्या भरल्यात का? गिनता तरी येतं का? असा खोचक सवालही अजित पवारांनी केला.

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar ncp slams cm eknath shinde devendra fadnavis on vedanta foxconn project beed news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

IPL-2023 | टी-20 क्रिकेटमध्ये मोठे बदल ! आता आयपीएलमध्ये 15 खेळाडूंचा संघ मैदानात उतरणार

Devendra Fadnavis | ‘… तर देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार का?’ – राष्ट्रवादी

Dhananjay Munde | ‘अजित पवारच सरकारला शिस्तीत आणू शकतात’, पक्षाच्या मेळाव्यात धनंजय मुंडेंची फटकेबाजी (व्हिडिओ)