“हिंमत असेल तर माढ्यातून लढाच”, पवारांचं ‘यांना’ खुलं आव्हान 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथील भाजप -शिवसेना मेळाव्यादरम्यान बोलताना “शरद पवार यांच्याबद्दल आदर आहे. मात्र जर त्यांनी निवडणूक लढवली तर इतिहासात पहिल्यांदाच त्यांना पराभवाला सामारं जावं लागेल,” असे वक्तव्य केले होते त्यावरून आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. “कोल्हापूरचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही माढ्यातून लढाच. तुम्हाला चितपट केलं नाही तर नाव सांगणार नाही,” असे खुले आव्हान पवार यांनी केलं आहे. ते भोसरी येथील जाहीर सभेत बोलत होते.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, ” चंद्रकांत पाटील काहीही बरळू लागले आहेत. म्हणे यावेळी पवार साहेबांचा पराभव होणार. हा बाबा स्वप्नात आहे की, बावचळून गेलाय कोणाला माहिती. ना कधी खासदारकी लढले ना आमदारकी अन् तरी आम्हाला फुकटचे सल्ले द्यायला निघाले आहेत. त्यांनी आधी आपली पाटीलकी सांभाळावी. उगाच काहीही गरळ ओकू नये आणि त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी माढ्यातुन लढावं. नाही चितपट केलं तर नावच सांगणार नाही,” असं आव्हान अजित पवार यांनी दिलं.

माझी पत्नी जरी राष्ट्रवादी मधून उभी राहिली तरी मी शिवसेनेच्या उमेदवाराचाच प्रचार करणार

भाजप -सेना युतीनंतर कोल्हापुरात आगामी लोकसभेच्या उमेदवारांबाबत चर्चा सुरू आहे. त्यातच शिवसेनेकडून प्रा.संजय मंडलिक आणि धनंजय महाडिक यांच्यात चुरस रंगणार असे चित्र आहे. महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे महाडिकांना साथ देणार अशी चर्चा होती मात्र “समजा माझी पत्नीने जरी उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली, तरी मी शिवसेनेच्याच उमेदवाराचा प्रचार करणार. असे वक्तव्य राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे. ते मुरगूड येथे आयोजित शिवसेना-भाजप मेळाव्यात बोलत होते.

ह्याही बातम्या वाचा –

धक्कादायक ! अल्पवयीन विद्यार्थीनीवर ४ कंडक्टरचा सामुहिक बलात्कार 

साईभक्तांसाठी मुंबई-शिर्डी स्वतंत्र पालखीमार्ग 

आ. कांबळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मागे 

‘..तर पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांच्या घरासमोर कला सादर करू’ 

विद्यार्थ्याच्या खिशात कॉपी ऐवजी सापडले ‘हे’ पत्र