Ajit Pawar | कुत्री, मांजरं, कोंबड्यांचं आपण प्रतिनिधित्व करत नाही याचं भान ठेवा, अजित पवारांनी सभागृहातच खडसावलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मतदारसंघातील लाखो मतदार तुम्हाला निवडून देतात तेव्हा तुम्हाला विधिमंडळाच्या सभागृहात (Legislative Assembly) येण्याची संधी मिळते. तेव्हा आपण कुत्री (Dog), मांजर (Cat), कोंबड्यांचे (Chicken) प्रतिनिधित्व करत नाही, याचे भान ठेवले पाहिजे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभागृहातच खडसावलं. तुम्ही सभागृहात प्राण्याचे आवाज काढता तेव्हा तो या मतदरांचा विश्वासघात आणि अपमान ठरतो. तुम्ही सभागृहात आवाज काढता किंवा टवाळी करता हे पाहून मतदारांना (Voters) काय वाटत असेल याचा विचार आमदारांनी (MLA) करावा, असे वक्तव्य करत अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभागृहातील नवख्या आमदारांना कानपिचक्या दिल्या.

विधिमंडळातील सभागृहांच्या वर्तनाविषयी आचारसंहिता (Code of Conduct) निश्चित करण्यासाठी आज विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीनंतर सभागृहात आमदारांकडून शिष्टाचार (Manners) सोडून होणाऱ्या वर्तनाला पायबंद घालण्यासंदर्भात चर्चा झाली. यावेळी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, मी पहिल्यांदा आमदार होऊन सभागृहात आलो तेव्हा मधुकरराव चौधरी (Madhukarrao Chaudhary) विधानसभेचे अध्यक्ष होते. ते सभागृहात उभे असले की आम्ही दरवाजात थांबायचो. पण हल्ली सभागृहात असे कोणतेही नियम पाळले जात नसल्याचे पवार यांनी सांगितले.

कॅबिनेट मंत्र्याशीही पाठीमागे राहून बोलायचो

अजित पवार पुढे म्हणाले, त्यादिवशी एक आमदार माझ्या बाजूला मुख्यमंत्र्यांच्या (CM) आसनावर येऊन बसला. तेव्हा मी त्याला म्हटले की, किमान मुख्यमंत्र्यांची खुर्ची तरी राहू दे. तुला 145 आमदारांचा पाठिंबा मिळाला की इकडे बस. आमच्या काळात आम्ही सभागृहात कॅबिनेट मंत्र्यांशीही (Cabinet Minister) त्यांच्या मागे उभे राहून बोलत होतो. पण आताचे आमदार दर दहा मिनिटांनी एक पत्र आणून देतात. क्रॉसिंगचा नियम तर कोणीच पाळत नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले.

पूर्वी अध्यक्षांना नमस्कार करायचो

एखादा सदस्य बोलत असताना काहीजण गप्पा मारत असतात.
आम्ही पूर्वी सभागृहात येताना अध्यक्षांना नमस्कार करायचो, जातानाही त्यांना नमस्कार करुन सभागृहाबाहेर पडायचो.
परंतु आता कोणीही आमदार झाले की त्यांना आपल्याला सगळं समजतं असे वाटू लागते.
एवढे वर्षे सभागृहात असूनही आम्हाला अजून सर्व समजले नाही तर त्यांना कुठून समजणार, असा सवाल त्यांनी केला.

Web Title : Ajit Pawar | deputy chief minister of maharashtra ajit pawar slams bjp mla nitesh rane over aaditya thackeray insult

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या

कमजोरी दूर करण्याचे ‘हे’ ९ घरगुती उपाय, शरीर होईल ‘ताकदवान’, जाणून घ्या

तब्बल ३०० रोगांवर शेवगा ‘गुणकारी’ ! जाणून घ्या खास घरगुती उपाय

Maharashtra Police |  पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ

PM Narendra Modi | मुलांना कोणती व्हॅक्सीन दिली जाणार, रजिस्ट्रेशन कसे होणार? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर