जगताप कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री पवार यांनी केले ‘सांत्वन’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –   ऑनर किलिंग मध्ये मृत्यू झालेल्या पिंपळे सौदागर येथील जगताप कुटुंबाचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी रविवारी सांत्वन केले. तसेच याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देखील दिले.

पवार यांनी विराज जगताप याच्या घरी आज (दि.१४) भेट दिली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे उपस्थित होते. गेल्या आठवड्यात विराज जगताप या तरुणाचा पिंपळे सौदागर मध्ये खून झाला होता. याप्रकरणी सहाजणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना ऑनर किलिंगचा प्रकार असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज जगताप कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देखील दिले.

विराज जगताप खून प्रकरणावरून राजकीय पक्षाचे नेते कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी शहरात दाखल होत आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, आरपीआय नेते दीपक निकाळजे यांनी शनिवारी या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी रविवारी जगताप कुटुंबीयांची भेट घेतली.