अजित पवारांनी घेतली कार्यकर्त्यांची ‘शाळा’, सांगितल्या ‘या’ 5 महत्वाच्या गोष्टी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले, त्यानंतर पिंपरीत बोलताना होमपीचवर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांचे कान पिळले आहेत. सरकार आपलं आहे, तेव्हा गाड्यांवर दादा-मामा लिहू नका, नियमात वागा असे शब्द कार्यकर्त्यांची शाळा घेतली. अजित पवार आज पुण्यात दौऱ्यावर होते.

यावेळी ते म्हणाले, महाविकासआघाडीचे सरकार आले म्हणून अतिउत्साह दाखवून उतू नका, मातू नका, जमिनीवर पाय ठेवून काम करा. सरकार आपले आले म्हणजे जबाबदारी वाढली आहे, अन्याय झाला तर मागे उभा राहील, पण कायदा मोडला तर मीच पोलीसांना सांगेल, त्यामुळे नियम पाळा असेही ते सांगायला विसरले नाहीत.

अजित पवारांनी मांडलेले मुद्दे –

1. कालपर्यंत जे तिकडे होते ते आज बुके घेऊन आले, तुम्ही लगेच पाघळतात.

2. पंकजा मुंडे आणि भाजप यांच्यात पक्षांतर्गत प्रश्न आहेत, त्यात नाक खूपसण्याची गरज नाही.

3. पिंपरी चिंचवड शहरात सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक पाणी टॅंचाई केली, टंकर माफीया कोणी आहे का हे पाहावे लागेल.

4. महापालिकेच्या कामात मरगळ आली आहे. जो कोणी विकास कामात हलगर्जीपणा करेल तर त्यांची हयगय केली जाणार नाही.

5.आपली ओळख कामगारांची नगरी म्हणून आहे. परंतू सगळ्या उद्योगांची वाताहत झाली. त्यावर आपल्याला उपाय-योजना कराव्या लागणार आहेत.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/