Ajit Pawar | …तर महापालिका आयुक्तांनी राजीनामा द्यावा; पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर अजित पवारांनी केली मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्याच्या पाणीप्रश्नावरून पालकमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीत आमचे समाधान झाले आहे. सत्ता बदलली तरी अधिकाऱ्यांची उत्तरे तीच आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी काहीही केले जात नाही. यामुळे ठरलेल्या वेळेत ही पाणीगळती न रोखल्यास महापालिका आयुक्तांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. राजकीय पक्षांनी यावर राजकारण न करता याकडे लक्ष द्यावे. अधिकारी मात्र तीच उत्तरे देत असल्याने हा प्रश्न सुटेल असे वाटत नाही, असेही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

 

पुण्याच्या पाणीप्रश्नासंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते. बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलताना त्यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अधिकाऱ्यांमुळेच हा प्रश्न अद्याप सुटला नसल्याचा आरोप करत पवार यांनी महापालिका आयुक्तांच्या उत्तरावर नाराजी व्यक्त केली.

 

अजित पवार म्हणाले, महापालिका आयुक्तांनी 40 टक्के पाण्याची गळती होत असल्याचे कबूल केले आहे. ते पालिकेच्या रेकॉर्डवर आहे. जलवाहिन्या, कालव्यातून होणाऱ्या पाण्याच्या गळतीमुळे पालिकेला 21 टीएमसी पाणी घ्यावे लागते. त्यामुळे हे पाणी महापालिकेच्या खात्यावर पडत आहे. पुणेकर एवढे पाणी वापरत नसताना चुकीचा आरोप केला जात आहे. मात्र, यात केवळ अधिकाऱ्यांची चूक असल्याचे अजित पवार यांनी म्हटले.

अजित पवार म्हणाले, मी तीस वर्षांपासून जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.
यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि त्यानंतर भाजपची सत्ता आली.
सौरभ राव, शेखर गायकवाड आणि आता विक्रम कुमार असे महापालिका आयुक्त पाहिले आहेत.
आयुक्त बदलले, पण अधिकाऱ्यांची उत्तरे मात्र बदलली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
पाणीगळती रोखण्यासाठी आयुक्तांना सप्टेंबर 2023 पर्य़ंतची मुदत दिली आहे.
या मुदतीत पाणीगळती रोखावी, अन्यथा आयुक्त ज्या ठिकाणी असतील तेथे त्यांनी राजीनामा द्यावा,
अशी मागणी अजित पवार यांनी केली.

 

वेळेत कामे पूर्ण करा – चंद्रकांत पाटील
शहरातील पाणी वापर नियंत्रित करण्यासाठी मनपाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आढावा घेतला.
समान पाणीपुरवठा योजनेसह पाणीपुरवठ्याची अन्य सर्व कामे महानगरपालिकेने निर्धारित कालमर्यादेतच पूर्ण करावीत,
कोणताही विलंब होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

 

Web Title :- Ajit Pawar | Pune PMC municipal commissioner should resign if water leakage is not stopped ncp leader ajit pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shinde-Fadnavis Govt | आधी मंत्रिमंडळ विस्तार, की महामंडळ वाटप? शिंदे – फडणवीसांकडून लवकरच मोठा निर्णय

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदेंवर त्यांचे आमदार नाराज; ठाकरे गटाच्या नेत्यानं सांगितलं

Siddarth Jadhav | सिद्धार्थ जाधवच्या येण्याने घरात निर्माण होणार टेन्शनचे वातावरण; कारण सिद्धार्थ जाताना…..