विलास लांडेंना सांगा सारखं सारखं फोन नका करू, अजित पवारांनी भरसभेत लांडेंना सुनावले

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा कालचा (शुक्रवार) शेवटचा दिवस होता. अजित पवार इंदापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार दत्ता भरणे यांचा फॉर्म भरण्यासाठी इंदापूरमध्ये आले होते. त्यावेळी जाहीर सभा सुरु असताना भोसरीचे विलास लांडे यांनी अजित पवार यांना फोन केला. सभा सुरु असल्याने अजित पवार यांनी फोन उचलला नाही. तरी देखील विलास लांडे सारखा फोन करत होते.

शेवटी वैतागून अजित पवार यांनी कार्यकर्त्याकडे फोन देऊन विलास लांडेंना सांगा, सारखं सारखं फोन नका करू असे अजित पवार भरसभेत बोलले. भाषण सुरु असताना विलास लांडे यांचा फोन आल्याची चिठ्ठी अजित पवारांना देण्यात आली. त्याच वेळी विलास लांडे यांचा फोन आला. त्यावेळी अजित पवार म्हणाले, ‘विलास लांडेंना सांगा, तुला काय करायचे ते कर. सारखे सारखे फोन करू नकोस. फॉर्म भरायला दहा मिनीटे शिल्लक असताना आता विचारतोय फॉर्म भरू का ? इतके दिवस काय त्याला आडवले होते का ?’

दरम्यान, त्यांनी विलास लांडे यांचा एक किस्सा सांगितला. मागच्या वेळी इंदापूरमध्ये मार्केट समितीमध्ये सभा सुरु असताना विलास लांडेचा फोन आला. त्यावेळी मी काहीतरी बोललो आणि ते संपूर्ण महाराष्ट्रात गाजले. इंदापूरचे आणि विलास लांडे याचे काय संबंध आहेत हे माहित नाही असे सांगताच एकच हशा पिकला.

Visit : Policenama.com