भोसरी आणि चिंचवड मतदार संघातील अपक्ष उमेदवारांना महाआघाडीचा पाठिंबा : अजित पवार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी, चिंचवड, भोसरी शहरात अराजकता वाढलेली आहे. भाजप-शिवसेनेने वाढलेला भ्रष्टाचार थांबवणे गरजेचे असून गुन्हेगारी रोखणेही काळाची गरज आहे. अराजकता, भ्रष्टाचार, गुंडगिरी थोपविन्यासाठी भोसरीत विलास लांडे आणि चिंचवड़ मधे राहुल कलाटे यांना पाठिंबा जाहिर केला असल्याची अधिकृत घोषणा राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वल्लभनगर येथे पत्रकार परिषदेत केली.

यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी आमदार पिंपरी मतदार संघाचे आघाडीचे उमेदवार आण्णा बनसोडे, भोसरीचे उमेदवार विलास लांडे, चिंचवडचे उमेदवार राहुल कलाटे, विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक दत्ता साने, डब्बू आसवानी, नगरसेविका मंगला कदम, नगरसेवक योगेश बहल, वैशाली काळभोर, राजू मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

पवार म्हणाले की, पिंपरी चिंचवड भोसरी मतदारसंघात भ्रष्टाचार वाढला आहे. गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढून महिला-मुलीही सुरक्षित नाहीत. पोलिस आयुक्तालय होवूनही त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. पिंपरी चिंचवड आणि भोसरीच्या विकासासाठी आम्ही अपक्ष उमदेवारांना पुरस्कृत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. महायुतीच्या उमेदवारांना रोखण्यासाठी हा निर्णय आम्ही सर्वामते घेतलेला असल्याचे ते म्हणाले.

Visit : Policenama.com