Ajit Pawar | राज ठाकरेंच्या बोलण्याला महत्व देण्याची गरज नाही – अजित पवार

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Ajit Pawar | शरद पवार साहेबांनी कायमच पुरोगामी विचार मांडले आहेत, हे सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. कधीतरी काही लोक असे बोलून जातात, त्याला महत्व देण्याचे काम नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या त्या वक्तव्यावर सूचक वक्तव्य केले आहे.

हिंदुत्वाच्या राजकारणाला शह देण्यासाठी महाराष्ट्रात जातीचे राजकारण सुरू झाले आहे का?, असा सवाल राज ठाकरे यांना काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. यावर राज यांनी म्हटले होते की, राज्यात आधीपासूनच जाती होत्या. पण जाती अभिमान बाळगण्यापुरत्याच होता. पण गेल्या 20 वर्षांपासून चित्र बदलले.

लोक जातीचा अभिमान बाळगण्याबरोबरच इतर जातींचा तिरस्कार करू लागले आहेत.
हे सर्व राजकीय स्वार्थातून होत आहे. जातीचा मुद्दा हा तर नेत्यांची ओळख होत आहे.
राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीचा मुद्दा सर्वार्थाने मोठा झाला, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधल्याने राष्ट्रवादीकडून प्रतिक्रिया येणे स्वाभाविक होते.
अपेक्षेनुसार राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी ठाकरे यांच्या या आरोपाला उत्तर दिले होते.
पवार यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत म्हटले होते की, त्यांच्यावर न बोललेलंच बरं, त्यांनी प्रबोधनकारांचे लिखाण वाचावे.

Web Title : Ajit Pawar | there no need give importance raj thackerays speech indicative statement ajit pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Pune Crime | बँकेत बॅलन्स नसताना दिला अडीच कोटीचा धनादेश; फसवणूक केल्या प्रकरणी एकावर FIR

Pimpri Chinchwad Corporation | महापालिकेची महासभा सत्ताधारी भाजपाने रेटली, 10 मिनिटांत 22 विषय मंजूर करत गुंडाळले कामकाज

Pune Crime | धक्कादायक ! 19 वर्षीय तरुणीची दत्त मंदिरात आत्महत्या, परिसरात खळबळ