Paytm चा इशारा ! जर ग्राहकांनी ‘ही’ गोष्ट ऐकली नाही तर रिकामं होईल बँक अकाऊंट

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – जर तुम्ही कोरोना दरम्यान कॅशलेस झाले असाल आणि पेटीएम वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. पेटीएम युजर्ससाठी, संस्थापकाने चेतावणी दिली की, ग्राहकांनी दुप्पट पैसे देण्यासारख्या बनावट ऑफरबाबत सतर्क असणे गरजेचे आहे. ट्विटरवरील पोस्टच्या माध्यमातून ग्राहकांना अशा घोटाळ्यापासून वाचण्याचे आवाहन विजय शेखर यांनी केले आहे. ट्विटरवर शर्मा ऑनलाइन फसवणूकीमध्ये बळी पडलेल्या एका युजर्सच्या प्रश्नाला उत्तर देत होते. पोस्टमध्ये शर्मा यांनी युजर्सला एका नवीन घोटाळ्याबद्दल सांगितले ज्यामध्ये पेटीएम युजर्सला पैसे दुप्पट करण्याचे सांगून लुबाडले जाते. शर्मा यांनी आपल्या पोस्टमध्ये एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे जो या फसवणुकीचा बळी ठरलेल्या युजर्सने त्यांना पाठविला होता.

टेलिग्रामच्या माध्यमातून होणारी फसवणूक
शर्मा यांनी ट्विटरवर शेअर केलेला स्क्रीनशॉट दर्शवितो की, टेलिग्रामच्या एका ग्रुपच्या माध्यमातून युजर्सकडून पैसे पेटीएम करण्यास सांगितले जाते. त्याचबरोबर त्यांनी पेटीएमद्वारे पाठविलेल्या पैशाच्या दुप्पट रक्कम त्यांना परत केली जाईल, असे सांगून त्यांना लुबाडले जाते.

पेटीएमच्या नावाखाली अनेकांची फसवणूक झाली आहे
पेटीएम केवायसीच्या नावावर फसवणूकीचा प्रकार समोर आला आहे. कॉलवर ग्राहकांना ऑनलाईन व्हेरिफिकेशनसाठी मोबाइलवर लिंक पाठविली जाते. यावर क्लिक केल्यास खात्यातून 17 हजार रुपये कट होतात. अशाप्रकारे फसवणूक होत आहे.

मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये पेटीएमकडून फसवणूकीचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतरही पेटीएम संस्थापकाने लोकांना पेटीएमशी संबंधित बनावट कॉल, एसएमएसद्वारे सतर्क राहण्याचे आवाहन केले होते. बनावट कॉल आणि एसएमएसद्वारे बनावट व्यक्तींनी पेटीएमची केवायसीच्या नावाने फसवणूक केली होती.