राजकीय पक्षांसाठी निवडणूक आयोगाचा नवा नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निवडणूक आयोगाने शनिवारी (दि.१६) एक नवा नियम राजकीय पक्षांसाठी जारी केला आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला त्यांचा जाहिरनामा प्रत्यक्ष मतदानाच्या ४८ तास अगोदर मांडता येणार आहे. मतदानापूर्वी काही तास अगोदर प्रचार थंडावतो. मतदारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव असू नये यासाठी हा नियम गेल्या काही निवडणुकीदरम्यान पाळण्यात येत आहे.

याच नियमाचा एक भाग म्हणून कुठल्याही टप्प्यात निवडणूक असली, तरी त्याच्या आधी 48 तास राजकीय पक्षांनी जाहीरनामे सादर करू नयेत, अशा अर्थाचं पत्र निवडणूक आयोगाने शनिवारी सगळ्या पक्षांना पाठवलं. पूर्वीच्याच नियमाचा हा भाग आहे, हे स्पष्ट करत आयोगाने अशा प्रकारे आश्वासनं देणारे जाहीरनामे प्रचाराचा काळ संपल्यानंतर जाहीर करू नयेत, असं सांगितलं आहे. हा आचारसंहितेचाच एक भाग आहे.

देशात आचारसंहिता लागू झालीय. त्यामुळे देशभरात राजकीय पक्षांचे होर्डिंग्ज, बॅनर, पोस्टर काढली जात आहेत. आचारसंहितेचं कुणी उल्लंघन केलं तर 1095 या हेल्पलाइनवर तुम्ही संपर्क करून सांगू शकता. 100 मिनिटांच्या आत कारवाई होईल.