Coronavirus : वुहानमध्ये ‘कोरोना’ फोफावल्यानंतर चीनमधून अमेरिकेत गेले होते 4 लाखाहून अधिक लोक : US मीडिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेत सध्या कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढत असून यादरम्यान अमेरिकेच्या मीडियाने एक खुलासा केला आहे. एका वृत्तसंस्थेनुसार, चीनद्वारे कोरोना व्हायरसबाबत खुलासा केल्यानंतर, तब्बल ४,३०,००० लोकं चीनमधून थेट उड्डाणाने अमेरिकेत पोचले होते, ज्यात हजारो लोकं चीनच्या कोरोना व्हायरसने सर्वात जास्त प्रभावित वुहान येथून अमेरिकेत आले.

एका वृत्तपत्रानुसार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प द्वारे प्रवासी बंदी लागू करायच्या अगोदर चीनमधून १७ अमेरिकन शहरांसाठी १३०० पेक्षा जास्त थेट विमानांनी लाखो लोकं परत आणले गेले.

तसेच दावा केला गेला आहे की, दोन्ही देशांच्या एकत्रित केलेल्या आकडेवारीच्या विश्लेषणानुसार, चिनी अधिकाऱ्यांनी नवीन वर्षाच्या संध्याकाळी आंतरराष्ट्रीय आरोग्य अधिकाऱ्यांना न्यूमोनियासारख्या रहस्यमय आजाराचा प्रादुर्भाव उघडकीस आणला होता, यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी घातलेले प्रवासी निर्बंध या तैनात करण्यापूर्वीच्या दोन महिन्यांत चीनकडून थेट विमानाने ४.३० लाख लोक अमेरिकेत पोहोचले.

विमानतळावर चाचण्या करण्यात आणि चीनमधून आलेल्या प्रवाशांच्या पाठपुराव्याबाबत फारसे कठोर नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अहवालात दावा करण्यात आला आहे की, अमेरिकेतील आरोग्य तपासणी जानेवारीच्या मध्यापासून सुरू झाली, परंतु केवळ त्या प्रवाश्यांसाठी जे वुहानमध्ये होते आणि फक्त लॉस एंजेलिस, सॅन फ्रान्सिस्को आणि न्यूयॉर्कमधील विमानतळांवर असलेल्यांसाठी होते.

मीडियाच्या वृत्तानुसार, चीनची एक विमान डेटा कंपनी VariFlight च्या हवाल्यात असे म्हटले आहे की, त्या काळात सुमारे ४००० लोक आधीच वुहानमधून अमेरिकेत दाखल झाले होते.