केवळ पंतप्रधानांसाठीच SPG ! पदावर नसताना 5 वर्षांसाठीच सुरक्षा’कवच’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी दुपारी एसपीजी दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर केले. आता पंतप्रधानांना ही सुरक्षा मिळणार आहे, त्याशिवाय माजी पंतप्रधानांच्या कुटुंबाला पाच वर्षांसाठी ही सुविधा मिळेल अशी माहिती शहा यांनी दिली आहे. हे विधेयक एकमताने पास करावे अशीही विंनती सभागृहाला अमित शाह यांनी केली.

एसपीजी कायदा दुरुस्तीत काय झाले ?

अमित शहा म्हणाले की, ‘1991-94 मध्ये यामध्ये पहिल्यांदा दुरुस्ती करण्यात आली होती त्यांनतर अनेकदा दुरुस्ती करण्यात आली. या दुरुस्तीनंतर जो कायदा करण्यात येईल, जो पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबियांना लागू होईल. जे पंतप्रधानांच्या निवासस्थानी राहतात त्यांना ही सुरक्षा मिळेल. माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांना पाच वर्षांच्या कालावधीसाठी एसपीजी संरक्षण मिळेल.’

राज्यघटनेनुसार सरकारचे प्रमुख हे पंतप्रधान असतात, त्यांचे कार्यालय सुरक्षित करण्यासाठी एसपीजीची स्थापना केली गेली आहे. दोन माजी पंतप्रधान आपल्या देशात मारले गेले, जे देशासाठी मोठे नुकसान आहे, त्यानंतर हा कायदा बनविण्यात आला. आता आमचे सरकार त्यात बदल करीत आहे, ज्या अंतर्गत पंतप्रधानांना हे संरक्षण मिळेल.

एसपीजी महत्वाची का आहे ?

पंतप्रधान अनेक कठोर निर्णय घेतात, जे देशात व आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण राहतात. पंतप्रधानांना सुरक्षित करण्यासाठी एसपीजी आवश्यक आहे. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर गठित समितीने एसपीजीची मागणी केली होती.

केंद्र सरकारने एसपीजीच्या नियमात काही बदल केले आहेत. यामुळे गांधी परिवारातून एसपीजी सुरक्षा मागे घेण्यात आली आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना आतापर्यंत एसपीजी सुरक्षा मिळायची पण आता त्यांची सुरक्षा सीआरपीएफच्या ताब्यात गेली आहे.

मनीष तिवारी यांनी प्रश्न उपस्थित केले

या विधेयकावरील चर्चेदरम्यान लोकसभेतील कॉंग्रेसचे खासदार मनीष तिवारी म्हणाले की, इतिहास या गोष्टीचा साक्षीदार आहे की जेव्हा जेव्हा अशी नकारात्मक पावले उचलली जातात तेव्हा या देशाचे मोठे नुकसान झाले आहे. सरकार एखाद्या व्यक्तीला सुरक्षा का देते. लोकांच्या सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मग सरकार असे सूचित करते की असे काही लोक आहेत ज्यांना सरकारकडून संरक्षणाची आवश्यकता आहे. धमकी मूल्यांकनानुसार (थ्रेट असेसमेंट) वेगवेगळ्या प्रकारात सुरक्षा प्रदान केली जाते. हे योग्य नाही.

Visit : Policenama.com