‘…म्हणून तुमचं घर चालतंय !’, ‘बिग बी’ अमिताभला यूजरनं सुनावलं

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या फेमस शो कौन बनेगा करोडपतीचं (Kaun Banega Crorepati) सूत्रसंचालन करत आहेत. अलीकडेच त्यांनी एक पोस्ट शेअर केली होती. यामुळं त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

बिग बी अमिताभ यांनी सोशलवर त्यांचा कोन बनेगा करोडपतीमधील एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं होतं की, एक गोष्ट निश्चित आहे या जगात लोकांकडे खूप रिकामा वेळ आहे.

यावर एका यूजरनं अमिताभ यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. एका यूजरनं अमिताभ यांच्या या ट्विटला उत्तर देत लिहिलं की, लोकांकडे 3 तासांचा रिकामा वेळ आहे म्हणून तुमच्यासारख्या अभिनेत्यांचं घर चालत आहे असं म्हणत त्यानं सुनावलं आहे.

आणखी एका यूजरनंही यावर कमेंट करत रिप्लाय दिला आहे. बरोबर आहे तुमचं. तुमच्याकडे खूप रिकामा वेळ आहे म्हणून तुम्ही प्रत्येक ट्विटला नंबर देता असं म्हणत त्या यूजरनं बिग बींना ट्रोल केलं आहे.

https://twitter.com/jigneshmawaalee/status/1324774386826530816?s=20

अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच त्यांचा गुलाबो सिताबो ओटीटीवर रिलीज झाला आहे. याच वर्षात अमिताभ बच्चन अनेक सिनेमांमध्ये दिसणार आहेत. यामध्ये ब्रह्मास्त्र, झुंड, चेहरे, अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. यापैकी झुंड सिनेमाचा टीजर आधीच रिलीज झाला आहे. नागराज मंजुळे या सिनेमाचं डायरेक्शन करत आहेत. नागपूरमध्ये सिनेमाची शुटिंग झाली आहे.