‘बिग बी’ अमिताभच्या शरीरात इंजेक्शननं पोहचवलं जातंय ‘औषध’, डॉक्टरच्या सल्ल्यानंतर देखील नाही ‘मानत’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूडच्या प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांनी आज बॉलिवूडमध्ये 50 वर्ष पूर्ण केले. यावेळी त्यांनी चाहत्यांना सांगितले कि, डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीची गरज असल्याचे सांगितले असून लवकरच ते पदार्पण करतील.

7 नोव्हेंबर 1969 रोजी त्यांचा पहिला सिनेमा ‘सात हिंदुस्तानी’ प्रदर्शित झाला होता. त्यांनी त्यांच्या अधिकृत ब्लॉगवर लिहिले आहे कि, पृथ्वीवरील सफेद कपड्यांमधील देवदूतांनी त्यांना विश्रांतीची गरज असल्याचे म्हटले आहे. मात्र ते लवकरच पुनरागमन करणार असून त्यांनी यावेळी आपले उपचारासंबंधी काही फोटो पोस्ट करून आपल्या आरोग्याविषयी चाहत्यांना माहिती दिली.

संकटांनी घेरलो आहे मात्र पुढे जाणारच
यावेळी अमिताभ यांनी लिहिले कि, वाढत्या वयाबरोबर संकटांनी घेरलो असून प्रत्येक ठिकाणी एक नळी जात आहे. काही ठिकाणी सलाइन वॉटर, काही ठिकाणी इंजेक्शन तर काही ठिकाणी सोनोग्राफ मीटर जात आहे. इंजेक्शनच्या माध्यमातून शरीरामध्ये औषधे जात आहेत. मात्र मी लवकरच कामावर परतणार असून आपल्या चाहत्यांचे मी पुन्हा एकदा मनोरंजन करणार आहे.

आगामी चार सिनेमांत झळकणार
अमिताभ बच्चन पुढील काळात झुंड, चेहरे, गुलाबो सिताबो आणि ब्रह्मास्त्र या चार सिनेमांत झळकणार असून सध्या कोण बनेगा करोडपतीचे शूटिंग सुरु आहे.

Visit : Policenama.com