Video : प्रभासच्या सिनेमात दिसणार Big B अमिताभ, म्हणाला- ‘स्वप्न सत्यात उतरतंय’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  – डायरेक्टर नाग अश्विनच्या प्रभास आणि दीपिका पादुकोणच्या आगामी सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. प्रभास आणि दीपिकाला एकत्र पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. अशात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या सिनेमात बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन यांची एन्ट्री झाली आहे. ट्रेड अ‍ॅनलिस्ट तरण आदर्शनं याबाबत माहिती दिली आहे. या सिनेमाचं नाव अद्याप ठरलेलं नाही.

तरण आदर्शनं लिहिलं की, अमिताभ-प्रभास-दीपिका… #Prabhas21 मध्ये (टायटल ठरलेलं नाही) अमिताभ बच्चन सुद्धा असतील. नाग अश्विन याचं डायरेक्शन करणार आहे. 2022 मध्ये हा सिनेमा विविध भाषांमध्ये रिलीज केला जाणार आहे.

अभिनेता प्रभासनंही एक व्हिडीओ शेअर करत लिहिलं की, फायनली, स्वप्न सत्य होणार आहे. लिजेंडरी अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे.

अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच त्यांचा गुलाबो सिताबो ओटीटीवर रिलीज झाला आहे. याच वर्षात अमिताभ बच्चन अनेक सिनेमांमध्ये दिसणार आहेत. यामध्ये ब्रह्मास्त्र, झुंड, चेहरे, अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. यापैकी झुंड सिनेमाचा टीजर आधीच रिलीज झाला आहे. नागराज मंजुळे या सिनेमाचं डायरेक्शन करत आहे. नागपूरमध्ये सिनेमाची शुटींग झाली आहे.

प्रभासच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तान्हाजी फेम ओम राऊतच्या आदिपुरुष या आगामी सिनेमात प्रभास रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. सैफ अली खान रावणाची भूमिका साकारणार आहे. सीतेच्या भूमिकेची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.