भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत पोलिसाचा जागीच मृत्यू

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत पेट्रोलिंग करणार्‍या पोलिसाचा मृत्यू झाला आहे. अमरावती पोलीस आयुक्तलयाच्या मुख्यालयात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचार्‍याला ट्रकने धडक दिली. ही घटना बडनेरा लोणी नजीक साई हॉटेलजवळ घडली. गोपाल इंगळे असे ठार झालेल्या पोलिसाचे नाव आहे.

ट्रक चालकास अटक करण्यात आली. गोपाळ यांचा मृतदेह अमरावती जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करिता ठेवण्यात आला आहे. सहकारी पोलीस कर्मचार्‍याचा अपघातात मृत्यू झाल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली असून शोककळा पसरली आहे. लॉकडाऊन करत निर्बंध कडक करण्यात आल्याने पोलिसांना रस्त्यावर उतरत अंमलबजावणी करावी लागत आहे. अशातच पेट्रोलिंग करत असताना एका पोलीस कर्मचार्‍याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.