पिंपरीमध्ये अण्णा बनसोडे एवढ्या मतांनी विजयी

पिंपरी :पोलिसनामा ऑनलाईन – पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अण्णा बनसोडे यांनी विजय मिळवला. अण्णा बनसोडे यांनी शिवसेनेच्या गौतम चाबुकस्वार यांचा दणदणीत पराभव करत विजय मिळवला.

2014 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झालेल्या चाबुकस्वार यांनी यावेळी देखील शिवसेनेच्या तिकिटावर लढत चांगली लढत दिली. मात्र अखेर बनसोडे यांनी विजय खेचून आणला. दोघांमध्येही काट्याची टक्कर झालेली पाहायला मिळाली.

मागील निवडणुकीत बनसोडे यांचा पराभव झाल्याने त्यांनी पुन्हा एकदा जोरदार तयारी करत चाबुकस्वार यांना अखेर अस्मान दाखवले. पक्षाने सुरुवातीला त्यांना तिकीट नाकारले होते. मात्र अखेर अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवशी उमेदवार बदलून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती.

उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते
1. अण्णा दादू बनसोडे (राष्ट्रवादी) -86873 विजयी झालेले उमेदवार 
2. अ‍ॅड. चाबुकस्वार गौतम सुखदेव (शिवसेना) -67095
3. धनराज गोविंद गायकवाड (बहुजन समाज पार्टी) -1212
4. गोविंद गंगाराम हिरोन्डे (बहुजन मुक्ती पार्टी) -249
5. प्रविण उर्फ बाळासाहेब गायकवाड (वंचित) -13681
6. संदिप कांबळे (गुरूजी) – (भारतीय धर्मनिरपेक्ष पक्ष) -254
7. अजय चंद्रकांत गायकवाड (अपक्ष) -461
8. अजय हनुमंत लोंढे (अपक्ष) -286
9. अ‍ॅड. ओव्हळ मुकूंद आनंदा (अपक्ष) -295
10. चंद्रकांत अंबादास माने (अपक्ष) -212
11. दिपक दगडू जगताप (अपक्ष) -295
12. दिपक महादेव ताटे (अपक्ष) -430
13. नरेश सुरज लोट (अपक्ष) -430
14. बाळासाहेब नामदेव ओव्हळ (अपक्ष) -935
15. मिनाताई यादव खिलारे (अपक्ष) -305
16. युवराज बागवान डाखले (अपक्ष) – 482
17. डॉ. राजेश नागोसे (अपक्ष) -348
18. हेमंत अर्जुन मोरे (अपक्ष) -568
19. नोटा -3240

Visit : Policenama.com