Coronavirus : बिल गेट्स यांच्या फंडिंगमधून अमेरिकी कंपनीनं बनवलं ‘कोरोना’ची दुसरी लस, माणसांवर परिक्षण सुरू

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. हा व्हायरस संपूर्णता नष्ट करण्यासाठी वैज्ञानिक वॅक्सीन तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अमेरिकेतील एक कंपनी मार्चच्या मध्यापासून कोरोनाच्या वॅक्सीनसवर काम करत आहे. परंतु आता आणखी एका अन्य पेंसिल्वेनिया बायोटेक कंपनीने देखील कोरोना वॅक्सीनचे परीक्षण सुरु केले आहे. इनोवियो फार्मास्यूटिक्सकडून तयार करण्यात आलेल्या या वॅक्सीनला यूएस फूड अ‍ॅण्ड ड्रग्स अ‍ॅडमिनिस्ट्रेशनले मंजुरी दिली आहे.

संशोधकांच्या मते, सोमवारी वॅक्सीनची पहिली चाचणी व्यक्तीवर करण्यात आली आहे. इनोवियो फार्मास्यूटिक्सकडून तयार करण्यात आलेल्या वॅक्सीनसाठी बिल अ‍ॅण्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन आणि एपिडेमिक प्रिपेडेन्स इनोवेशनकडून फंड देण्यात आला होता.

इनोवियो फार्मास्यूटिकल्सकडून तयार वॅक्सीन INO-4800 ची चाचणी समोवारी एका व्यक्तीवर करण्यात आली. अमेरिकेतील ही दुसरी कंपनी आहे जिने कोरोना वॅक्सीनला मानवी शरीरावर चाचणी करण्यास परवानगी मिळाली आहे. यापूर्वी मॅसाचुसेट्स बायोटेक मॉडर्नने मार्चच्या मध्यापासून याची चाचणी मानवी शरीरावर सुरु केली होती.

चाचणीचे अचूक परिणाम येण्यास लागेल 1 वर्ष –
अमेरिकी वैज्ञानिक डॉ. एंथनी एस फॉसी यांनी यापूर्वी देखील सांगितले होती की कोरोनाशी लढण्यासाठी तयार करण्यात येणारे वॅक्सीन सुरक्षित आणि प्रभावी आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी किमान 1 वर्षांचा कालावधी लागेल. इनोवियो फार्मास्यूटिकल्सने वॅक्सीनचे परीक्षण करण्यासाठी 40 निरोगी लोकांना निवडण्यात आले आहे. या लोकांवर चार आठवड्यात दोनदा चाचणी केली जाईल. कंपनीने सांगितले की लवकरच याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील.

2020 च्या अखेरीस 1 मिलियन वॅक्सिन तयार करणार कंपनी –
इनोवियो फॉर्मास्यूटिकल्सने सांगितले की चाचणीत जर वॅक्सीनचे सकारात्मक परिणाम दिसले तर 2020 च्या अंतापर्यंत 1 मिलियन वॅक्सीन उपलब्ध करुन दिल्या जातील. ते म्हणाले की वॅक्सीनचा वापर आपातकालीन परिस्थिती देखील केला जाऊ शकेल.