पोलिस स्टेशन मध्येच 50 हजाराची लाच घेणार्‍या हवालदाराला अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

ग्रामीण पोलिस दलातील शिक्रापुर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचार्‍याला तब्बल 50 हजार रूपयाची लाच घेताना लाचुलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. शनिवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिस कर्मचार्‍याला 50 हजाराची लाच घेताना पकडण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासुन ग्रामीण पोलिस दलात लाचखोरीचे प्रमाण वाढले असल्याचे अ‍ॅन्टी करप्शनच्या कारवाईवरून स्पष्ट होत आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’83e48463-c953-11e8-a06a-cd4397e48ea9′]

पोलिस हवालदार दत्‍तात्रय विष्णु होले (53, बक्‍कल नं. 829, शिक्रापुर पोलिस स्टेशन) असे लाच घेणार्‍याचे नाव आहे. होले हे पुणे ग्रामीण पोलिस दलातील शिक्रापुर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. याप्रकरणी 34 वर्षीय युवकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे. तक्रारदारास सीआरपीसी 156 (3) प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयात आरोपी न करता साक्षीदार बनविण्यासाठी पोलिस हवालदार दत्‍तात्रय होले यांनी शनिवारी (दि.6 ऑक्टोबर) रोजी एक लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदार आणि पोलिस हवालदार होले यांच्यामध्ये तडजोड झाली. तडजोडीअंती 50 हजार रूपये लाच घेण्याचे होले यांनी कबुल केले.
[amazon_link asins=’B078M16N8P’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’90eefcfe-c953-11e8-a874-63bcfcabd38e’]

दरम्यान, तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधुन हवालदार होले यांच्याविरूध्द तक्रार केली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. एसीबीच्या पथकाने सापळयाचे आयोजन केले. पोलिस हवालदार होले यांनी सरकारी पंचासमक्ष तक्रारदाराकडून 50 हजार रूपयाची लाच स्विकारली. ही लाच शिक्रापुर पोलिस ठाण्यातच स्विकारण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण पोलिस दलातील पोलिस ठाण्यात लाचखोरी जोरात चालु असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ही कारवाई पोलिस अधिक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधिक्षक सुहास नाडगौडा, महिला पोलिस निरीक्षक अर्चना दौंडकर, महिला निरीक्षक अनिता हिवरकर आणि त्यांच्या पथकाने केली आहे. महिला पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर करीत आहेत.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’89285386-c953-11e8-b73b-732e717d6884′]

शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा अथवा टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा असे आवाहन पुणे विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप दिवाण यांनी केले आहे. होले यांच्याविरूध्द शिक्रापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी करीत आहेत.