मिसिंगच्या तपासासाठी 5 हजाराची लाच घेणार्‍या पोलिसाला अटक

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन

अब्बास शेख

पुणे ग्रामीण पोलिस दलातील दौंड पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचार्‍याला 5 हजार रूपयाची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने शनिवारी दुपारी रंगेहाथ पकडले आहे. त्याच्याविरूध्द दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपुर्वी ग्रामीण पोलिस दलातील पौड पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍याला एसीबीच्या पथकाने लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. त्याला काही दिवस होवुन गेल्यानंतर दौंड पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचार्‍याला 5 हजाराची लाच घेताना अटक झाल्याने ग्रामीण पोलिस दलात खळबळ उडाली आहे. भीमा पाटस कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्यावेळी कारखान्याच्या मुख्य गेटवर हि लाच स्वीकारल्याचे समजत आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0eafeb9b-c3e4-11e8-8126-d94347568ca2′]

बापु रोटे असे लाच घेणार्‍या पोलिस कर्मचार्‍याचे नाव आहे. रोटे हे दौंड पोलिस ठाण्यात पोलिस नाईक म्हणुन कार्यरत आहेत. तक्रारदाराची बहिण 2 महिन्यांपुर्वी हरविली आहे. त्याबाबत दौंड पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्या मिसिंग प्रकरणाचा तपास पोलिस नाईक बापु रोटे यांच्याकडे आहे. तक्रारदाराच्या बहिणीचा शोध घेण्यासाठी येणार्‍या खर्चाची मागणी पोलिस नाईक बापु रोटे यांनी केली. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. एसीबीच्या पथकाने शनिवारी दुपारी सापळयाचे आयोजन केले. सरकारी पंचा समक्ष पोलिस नाईक बापु रोटे यांनी तक्रारदाराकडून 5 हजाराची लाच स्विकारल्यानंतर त्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

[amazon_link asins=’B01J82IYLW,B07GB9Z17Z’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9ac9bf43-c3e5-11e8-a12f-d774aab64d18′]

रोटे यांच्याविरूध्द यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. गेल्या महिन्याभरात पुणे ग्रामीण पोलिस दलात 2 ट्रॅप झाले असुन एका महिला पोलिस कर्मचार्‍याविरूध्द लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिस दलातील लाचखोरी वाढल्याचे दिसुन येत आहे. ग्रामीण पोलिस दलातील लाचखोरीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याने उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी त्याबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार द्यावी अथवा टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा असे आवाहन पुणे विभागाचे पोलिस अधिक्षक संदीप दिवाण यांनी केले आहे. पोलिस अधिक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधिक्षक सुहास नाडगौडा आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. दरम्यान, शनिवारी पहाटे साडे तीन वाजता एका पोलिस उपनिरीक्षकास 32 हजाराची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास एसीबीचे अधिकारीत आहेत.

32 हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकला अँटी करप्शनकडून अटक 

[amazon_link asins=’B01IH4PXKM,B073FKXQ9H’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d8b8c52f-c3d8-11e8-bb9c-41551f4ea19f’]