शिखर धवननं रोहित आणि त्याच्या मैत्रीवर लिहिली ‘ही’ खास कविता, अशी आहे ‘गब्बर’ आणि ‘हिटमॅनची मैत्री ’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन आणि त्याचा साथीदार रोहित शर्मा दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर आहेत. पुढील काही महिन्यानंतर दोघे एकत्र खेळताना दिसणार नाहीत. दरम्यान, डावखुरा फलंदाज शिखर धवनने आपला मित्र आणि सलामीचा साथीदार रोहित शर्मा यांच्यासाठी एक खास कविता लिहिली आहे, जी मैदानावर दोघांची मैत्री दर्शवते.
वास्तविक, शिखर धवनला कविता ऐकायला, ऐकवायला आणि लिहायला आवडते. कदाचित ही गोष्ट फारच कमी लोकांना माहित असेल. दरम्यान, आता तो सतत आपल्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवर व्हिडिओ शेअर करतो आणि कविता बोलताना दिसत आहे. डावखुऱ्या फलंदाजाची ही कला आता लोकांना ठाऊक होत आहे. दरम्यान, शिखर धवनने ‘गब्बर’ आणि ‘हिटमॅनच्या’ मैत्रीवर दोन ओळींची कविता लिहिली आहे.
शिखरने ट्विट केले ‘गब्बरचे शब्द’ :
शिखर धवनने आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर एक चित्र शेअर केले आहे, त्यात तो आणि रोहित दिसत आहेत. याच चित्रासह शिब्बर धवनने लिहिले आहे, “यारी भी की, यारी भी निभाई, खूब सारे रन की पारी भी निभाई…गब्बर और हिटमैन…हैशटैग गब्बर के शब्द!”
Yaari bhi ki yaari bhi nibhaayi
Khoob saare runs ki paari bhi nibhaayi..
Gabbar aur Hitman 😎#GabbarKeShabd @ImRo45 pic.twitter.com/UGATgqhpNA— Shikhar Dhawan (@SDhawan25) February 26, 2020
दरम्यान, दोन्ही फलंदाज जखमी झाले आहेत. जानेवारीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत शिखर धवनच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्याचवेळी न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी -२० मालिकेच्या शेवटच्या सामन्यात रोहित शर्माच्या पायाला दुखापत झाली. दोन्ही अनुभवी फलंदाजांनी नॅशनल क्रिकेट अकॅडेमी (एनसीए) येथे एकत्र खूप वेळ घालवला आणि दुखापतीतून बरे होत आहेत. शिखर धवन हा बांगलादेशात होणाऱ्या आशिया इलेव्हन आणि वर्ल्ड इलेव्हन सामन्यांमध्ये आशिया संघाचा भाग असतील. तर रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या वन डे मालिकेत पुनरागमन करू शकेल.