पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2 हजार 383 विशेष पोलिस अधिकाऱ्यांच्या नेमणूका

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास पोलिसांचे मनुष्यबळ कमी पडत असल्याने आता मदतीसाठी शहरात 2 हजार 383 विशेष पोलिस अधिकारी नेमण्यात आले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांना मदत म्हणून हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांना विशेष पोलिस अधिकारी (एसपीओ) म्हणून नियुक्ती करण्यास पोलिस आयुक्तांनी सुरवात केली आहे. नेमून दिलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून त्यांना काम करणार आहेत. या विशेष पोलिस अधिकाऱ्यांना कामांचे वाटप करण्यात आले आहे. ते सोसायटी संदर्भातील कामे करतील. तसेच, त्यांना विशेष पोलिस अधिकारी म्हणून दिलेल्या प्रमाणपत्राचा गैरवापर केल्यास हे पद रद्द केले जाणार आहे.

शहरात आतापर्यंत सोसाट्यांमधील 2383 जणांस विशेष पोलिस अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. त्यांना कामाच्या बाबतीत सूचना दिल्या आहेत. ते स्थानिक पोलिस ठाण्याच्या संपर्कात राहून काम करत आहेत. या विशेष पोलिस अधिकाऱ्याच्या नेमणुकीमुळे कामाचा ताण हलका होणार आहे. तसेच, त्यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची नजर राहणार आहे.