रिषी पांडे यांची तिरुमला तिरुपती देवस्थानचे सदस्य म्हणून नियुक्ती

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  तिरुमला तिरुपती देवस्थान वरप्रथमच महाराष्ट्र राज्यातील व्यक्तीची नेमणूक करण्यात आली आहे.

तिरुमला तिरूपती देवस्थान वर महाराष्ट्र राज्यांतून एकमेव मराठी माणुस रिषी पांडे (मुळशी तालुका, हवेली जिल्हा पुणे) यांची एलएसी मेंबर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जेष्ठ नेते शरद पवार आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या शिफारशींने तिरुमला तिरुपती देवस्थान ने ही नियुक्ती केली आहे तिरुमला तिरुपती देवस्थान च्या इतिहासात प्रथमच राज्याबाहेरील व्यक्तीची एल ए सी मेंबर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रिषी पांडे यांचे सामाजिक व धार्मिक कार्यपाहून ही नियुक्ती करण्यात आली आहे.

रिषी पांडे यांनी आपल्या निवडी नंतर लगेच च अखंडपणे सुरु असलेले अन्नछञ सुरू केले असून या अन्नछत्राचा असंख्य भक्त दररोज लाभ घेत आहेत.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिरुमला तिरुपती देवस्थान मध्ये गर्दी टाळण्यासाठी इ पास देण्यात येत आहेत. ज्यांना हे इ पास मिळाले आहेत त्यांनीच तिरुपती ला दर्शनासाठी यावे अन्यथा येऊ नयेत, नियम कडक करण्यात आले आहेत. असे आवाहन एल ए सी मेम्बर रिषी पांडे यांनी केले आहेत.