WhatsApp मध्ये अपडेट, अनेक फीचर्सच्या ‘लूक’ आणि ‘डिझाइन’मध्ये झाला बदल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी नवीन वैशिष्ट्ये आणि अपडेट सादर करत असते. युजर्स कंपनीच्या नवीन अपडेटची आतुरतेने वाट पाहत असतात. अलीकडेच अहवालात असे उघड झाले आहे की, लवकरच युजर्स व्हॉट्सअ‍ॅपवर पिक्चर-इन-पिक्चर मोडमध्ये शेअर चॅट व्हिडिओ पाहण्यास सक्षम असतील. त्याचबरोबर व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी चांगली बातमी आहे की, कंपनी व्हॉट्सअ‍ॅपच्या काही वैशिष्ट्यांचे डिझाइन आणि लूक बदलणार आहे आणि आपल्याला हा बदल नक्कीच आवडेल.

डब्ल्यूएबीएटाइन्फो अहवालात असे दिसून आले आहे की, नवीन 2.20.198.9 अपडेट आवृत्ती व्हॉट्सअ‍ॅपवर आली आहे आणि या अपडेटमध्ये बरीच बदललेली वैशिष्ट्ये दिसत आहेत. जे युजर्सला खूप वेगळा अनुभव देईल. नोंदवलेल्या अहवालानुसार, कंपनीने नवीन अपडेट आणले असून लवकरच ते सर्व युजर्सपर्यंत पोहोचणार आहे. या अपडेटमध्ये तुम्हाला आयकॉनसह जुना कॅमेरा शॉर्टकट कॅमेरा देखील दिसेल. शॉर्टकट कॅमेरा अलीकडेच हटवला गेला होता आणि त्याचे रूम बटण सादर केले गेले होते. पण नव्या अपडेटमुळे कॅमेरा शॉर्टकट बटणावरही पुनरागमन झाले आहे.

डब्ल्यूएबीएटाइन्फोच्या अहवालात व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या अपडेटची माहितीसह प्रतिमा देखील शेअर केली गेली आहे. ज्यामध्ये आपण रूम बटणाऐवजी कॅमेरा शॉर्टकट पाहू शकता. नवीन अपडटेमध्ये, आपल्याला कॅमेरा शॉटकार्ट व्यतिरिक्त गॅलरी, ऑडिओ, लोकेशन आणि संपर्क यासारखे वैशिष्ट्ये दिसतील. तसेच, नवीन अपडेट गुगल प्ले स्टोअरच्या बीटा प्रोग्राममध्ये उपलब्ध असल्याचेही अहवालात नमूद केले आहे. नवीन अपडेट व्यतिरिक्त व्हॉट्सअ‍ॅपने यापूर्वी दोन नवीन स्टिकर पॅक जोडले आहेत आणि माहितीही डब्ल्यूबेटाइन्फोने आपल्या ट्विटर अकाऊंटद्वारे शेअर केली होती. याय्या आणि हॅकर गर्ल हे नवीन स्टिकर पॅक एंड्रॉइड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवर सादर केले गेले आहेत.