तुमच्या मुली सुरक्षित आहेत का ?  हडपसर मध्ये ८वर्षीय चिमुरडीचा विनयभंग 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील हडपसर परिसरात राहणाऱ्या आठ वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची माहिती  मिळते आहे. संबंधित मुलगी शिकवणीला जात असताना एका अज्ञाताने हे कृत्य केली. याबाबत मुलीच्या आईने फिर्याद दाखल केली आहे. या आरोपीचे सीसीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाताने लागले असून पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. यावरून आता घरातून बाहेर पडलेल्या मुलींच्या  सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, हडपसर भागात राहणारी आठ वर्षीय मुलगी शिकवणीकरिता जात होती त्याचवेळेला मुलीला गाठून आरोपीने तिचा विनयभंग केल्याची माहिती मिळते आहे. या घटनेबाबत या मुलीने तिच्या आईला घडलेली हकीकत सांगितली. त्यानंतर मुलीच्या आईने पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून हडपसर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात ३५४ सह पॉस्को कायद्या आंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही . मात्र सीसीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती  लागले असून पोलीस याप्रकरणाचा  अधिक तपास पोलीस करीत आहेत.

लहान मुलांवरील अत्याचाराचे अनेक घटना उघडकीस येत आहेत. या घटनांना लगाम घालण्यासाठी कायदे अधिक कडक करण्यात आले आहेत. तुरुंग, आश्रमशाळा, बालसुधारगृहे, रिमांड होम, शैक्षणिक व धार्मिक संस्था, सरकारी रुग्णालये या ठिकाणी असलेल्या मुलांना तेथील कर्मचाऱ्यांकडून शारीरिक, मानसिक त्रास झाल्यास दोषी कर्मचाऱ्यांविरुद्ध या कायद्यांतर्गत कारवाई केली जाते. तसेच मुलांना देहविक्रय अथवा अन्य लैंगिक प्रकार, अश्लील चित्रपट बनविण्यासाठी मुलांचा वापर करणाऱ्यांविरोधातसुद्धा या कायद्याचा बडगा उगारता येतो. एखादे लैंगिक कृत्य करणारी व्यक्ती पीडित मुलांच्या गुप्त भागांना इजा होईल, असे कृत्य करीत असल्यास, पोलिस ठाण्यामध्ये अथवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांकडून मुलांवर लैगिक अत्याचार झाल्यास तसेच लष्करी जवानाने मुलांवर लैंगिक अत्याचार केल्यास त्या सर्व प्रकारच्या आरोपींवर ‘पोस्को’ कायद्याने कारवाई केली जाते.

काय आहे सध्याचा पॉस्को कायदा –
लहान मुलांवर होणारे लैंंगिक अत्याचार थांबवण्यासाठी हा कायदा पास करण्यात आला. या कायद्यानुसार फक्त अत्याचार करणाराच नाही तर ज्याला अत्याचाराची माहिती असूनही तक्रार दाखल करत नाही तोही आरोपी आहे.  मुलावर अत्याचार करणे ,बलात्कार करणे यासोबत  त्याची अश्लील चित्रफीत बनवणे हादेखील गुन्ह्यास पात्र आहे.

-लहान मुलांवर होणारं लैंगिक शोषणापासून संरक्षण करण्यासाठी २०१२ साली हा कायदा पास करण्यात आला.
-या खटल्याची सुनावणी विशेष न्यायालयात. ती १ वर्षात संपवणं बंधनकारक
 – कमीतकमी १० वर्ष तर जास्तीजास्त जन्मठेपेची शिक्षा
– लहान मुलाच्या लैंगिक शोषणाची चित्रफीत बनवल्यास त्यासाठी वेगळ्या शिक्षेची तरतूद