बॉम्बब्लास्टमध्ये जवान ‘शहीद’ झाला अन् 7 जन्माचं नातं अवघ्या 16 दिवसांत संपलं !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – जम्मू-काश्मीर येथे तैनात असलेले जवान सौरभ कटारा कुपवाडा येथील बॉम्बस्फोटात शहीद झाले असल्याची दुःखद घटना समोर आली आहे. सौरभ यांचा अवघ्या १६ दिवसांपूर्वी लग्न झालं होत. यांच्या जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली असून सौरभ यांच्या नवविवाहीत पत्नीला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, सौरभ यांचा बुधवारी वाढदिवस होता. त्यात ८ डिसेंबर रोजी सौरभ आणि त्यांच्या मोठ्या भावाचे एकाच दिवशी दोन सख्ख्या बहिणींसह लग्न झाले होते. त्यानंतर, पाच दिवसांपूर्वी रजा संपल्यानंतर सौरभ पुन्हा आपले कर्तव्य बजावण्यासाठी कुपवाडा येथे हजर झाले. पण काश्मीरमध्ये कुपवाडा येथे झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचा मृत्यू झाला आहे. सौरभ यांच्या मृत्यूची माहिती मिळताच गावात शोककळा पसरली आहे.

गहलोत यांनी म्हंटले की, ‘भरतपूर येथील शूर सैनिकाच्या हुतात्म्यास सलाम. जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे सर्वोच्च बलिदान करणारे सौरभ कटारा. या कठीण परिस्थितीत आम्ही सर्व आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत उभे आहोत. देव त्यांना सामर्थ्य देईल.’ सोबतच बुधवारी संध्याकाळी सौरभ कटारा यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी नेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/