Health Tips : ‘या’ 5 गोष्टींसह दही मिक्स करून खात असाल तर सावध व्हा, होऊ शकतं नुकसान

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जेवताना दही असेल तर जेवणात एक वेगळीच मजा येते. पण तुम्हाला माहिती आहे का दही खाण्याचे बरेच फायदे आहेत. तसेच दही चुकीच्या पदार्थासह खाल्ल्यास त्यामुळे नुकसानही होते. आयुर्वेदानुसार, दही विशेषतः या ५ पदार्थांसह कधीही खाऊ नये.

कांदा

जर तुम्ही दहीमध्ये कांदा घालून किंवा रायता करून खात असाल, तर तुम्हाला ही सवय बदलावी लागेल. कारण दही आतून थंड असते. तर कांदा शरीरात उष्णता निर्माण करतो. जेव्हा दोन्ही एकत्र खाल्ले जाते, तेव्हा ते शरीरासाठी हानिकारक असते. त्वचेची ऍलर्जी, रॅशेस यासारख्या समस्या होतात.

मासे

दही आणि मासे एकत्र खाणे हानिकारक आहे. बऱ्याचदा सल्ला दिला जातो की, दोन प्रकारचे प्रोटीन स्त्रोत एकत्र खाऊ नयेत. त्याचे दुसरे कारण असेही आहे की, दही गायीच्या दुधापासून तयार होते आणि मासे मांसाहारी असतात. जे एकत्र खाल्ल्यामुळे पोटात समस्या उद्भवते.

आंबा

दह्यात आंब्याचे छोटे-छोटे तुकडे खाणे म्हणजे मिठाई खाण्यासारखे आहे. परंतु हे शरीरासाठी तितकेच हानिकारक आहे. यामुळे शरीरात सर्दी आणि उष्णता निर्माण होते. ज्या नंतर शरीरात त्वचेशी संबंधित समस्या निर्माण होते.

उडद डाळ

दह्यासह ही डाळ खाण्यास आयुर्वेद स्पष्टपणे मनाई करतो. आयुर्वेदानुसार, उडीद डाळ आणि दही एकत्र खाल्ल्यास बराच काळ पोटासंबंधित समस्या निर्माण होऊ शकते.

दूध

दही आणि दूध कधीही एकत्र खाऊ नये. असे केल्यास तुम्हाला ऍसिडिटी आणि गॅस सारख्या समस्या होऊ शकतात.

तेलकट पदार्थ

पराठ्यां बरोबर दही खायला लोकांना आवडते. परंतु तुम्हाला माहिती आहे काय की तेलकट पदार्थ आणि दही शरीरासाठी खूप हानिकारक आहे. तुम्हाला आळशी बनवते. कदाचित हेच कारण आहे की, एक ग्लास लस्सी गरम छोले भटूरे खाल्ल्यानंतर पिल्याने लगेच झोप येते.