स्मृती इराणी शिक्षणावरून अडचणीत, शपथपत्रात चुकीची माहिती दिल्याप्रकरणी तक्रार

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी त्यांच्या शिक्षणावरून पुन्हा अडचणीत आल्या आहेत. त्यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रात चुकीची माहिती दिल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. लखनऊ काँग्रेसचे अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष तौहीद सिद्दीकी यांनी यावर आक्षेप घेत तक्रार दाखल केली आहे.

स्मृती इराणी यांनी २०१४ मध्ये निवडणूक लढविताना शपथपत्र दाखल केले होते. त्यात शपथपत्रात त्यांनी १९९४ मध्ये दिल्ली विश्वविद्यालयातून बॅचलर ऑफ कॉमर्सची पदवी घेतल्याचे म्हटले होते. परंतु यंदा दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांनी आपण पदवी घेतली नसल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे स्मृती इराणी यांनी आयोगाला खोटी माहिती दिल्याचा आरोप सिद्दीकी यांनी केली. त्यांना याबद्दल शिक्षा ठोठावण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान यंदा दाखल केलेल्या शपथ पत्रात स्मृती इरांणींनी आपण दिल्ली विश्वविद्यालयाच्या मुक्त शिक्षण विभागातून बी कॉम ची पदवी घेताना केवळ प्रथम वर्षाची परीक्षा दिली आहे. असं म्हटलं आहे. मात्र २००४ आणि २०१४ च्या निवडणूकीत त्यांनी वेगवेगळी माहिती दिल्याचं समोर आलं. त्यानंतर त्या वादग्रस्त ठरल्या होत्या. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री झाल्यावर त्यांच्यावर विरोधकांनी शिक्षणावरून टिका केली होती.

You might also like