विधानसभा निवडणूका पुढच्या वर्षी घ्या, ‘या’ पक्षाच्या अध्यक्षांची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. या भागातील परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी मोठा कालावधी लागणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

सध्याची पूरस्थिती पाहता तेथील नागरिकांचा प्रश्न गंभीर आहे मात्र भाजपा सरकारला आणि या मंत्र्यांना जनतेशी काहीही देणं घेण नाही.यांच्या निवडणुकीत जागा किती येणार असे आकडेही ठरले आहेत. तुम्ही पुरात अडका किंवा दुष्काळात लटका आम्हाला काय करायचंय, अशीच सत्ताधाऱ्यांची भूमिका आहे.

पावसाचे पाणी ओसरल्यानंतरही रोगराई आणि तेथील जनजीवन सुरळीत करण्याचा मोठा प्रश्न आहे. कोल्हापूर, सांगली आणि आजुबाजूचा परिसर आटोक्यात येण्यासाठी किमान ६ महिन्यांचा कालावधी जाईल. त्यामुळे निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुका पुढे ढकलाव्यात. त्यासाठी मी निवडणूक आयोगाला पत्रही लिहिणार असल्याचे राज ठाकरेंनी म्हटले आहे.

महिन्याभरात आचारसंहिता लागली तर सरकार अजिबात पूरग्रस्तांना मदत करणार नाही, त्यामुळे निवडणूक पुढील वर्षी घ्याव्यात अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि निवडणूक आयोग या मागणीवर काय प्रतिक्रिया देणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

 

You might also like