अंतिम क्षणी ऋषी कपूर यांनी मुलगा रणबीर कपूरला जवळ बोलावलं होतं, वाईफ नीतूदेखील उपस्थित होत्या !


पोलिसनामा ऑनलाइन –
बॉलिवूडमधील दिग्गज व जुन्या सुपरस्टारपैकी एक ऋषी कपूर यांनी गुरूवारी (दि 30 एप्रिल) जगाचा निरोप घेतला आहे. मुंबईच्या रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फुलांनी सजवलेल्या अ‍ॅम्ब्युलन्समधून त्यांना हॉस्पिटलमधून थेट स्मशानात नेण्यात आलं. या सगळ्यात आता ऋषी कपूर यांच्या शेवटच्या क्षणाशी संबंधित काही माहिती समोर येताना दिसत आहे. असं समजत आहे की, ऋषी कपूर आपल्या शेवटच्या क्षणी मुलगा रणबीर कपूरला भेटले आणि खूप काही बोलले आहे.

एका इंग्रजी वृत्तानुसार, जेव्हा ऋषी कपूर यांना आपली तब्येत आणखी बिघडल्याची जाणीव झाली तेव्हा मध्यरात्रीच त्यांनी रणबीरला आयसीयु वार्डात आपल्या जवळ बोलवून घेतलं. रणबीरला बेडवर बसवत त्यांनी त्याच्याशी खूप गप्प मारल्या. यानंतर रणबीर वार्डमधून कसातरी स्वत:ला सावरत आयसीयुच्या बाहेर पडला. यानंतर त्यानं सर्व फॉर्मेलिटीज पूर्ण केल्या.

रणबीर आणि नीतू ऋषी यांच्या जवळ होते. रिपोर्टमध्ये उल्लेख केल्यानुसार, अंतित क्षणी ऋषी यांचे सर्व बॉडी पार्ट्स काम करणं बंद झाले होते. तेव्हाच रणबीर आणि नीतू इमोशनल झाले होते. ते एकमेकांना पकडत सावरताना आधार देताना दिसले.

या दु:खी प्रसंगी मुलगी रिद्धीमा कपूर त्यांच्या पासून दूर होती. लॉकडाऊनमुळं त्यांना निरोप देणंही तिला शक्य झालं नाही. कारण यावेळी ती दिल्ली ते मुंबईचा प्रवास करत होती.