भाजप महापौरांकडून शिवसेना जिल्हा प्रमुखावर प्राणघातक हल्ला

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप महापौरांनी शिवसेना जिल्हा प्रमुखावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना जुने धुळे येथे घडली. हिलाल माळी असे शिवसेना जिल्हा प्रमुखाचे नाव आहे. याप्रकरणी महापौर पिता, पुत्रांसह आठ जणांवर आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती, शिवसेना जिल्हा प्रमुख एका हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी येत होते. त्यावेळी भाजप महापौर पिता,पुत्रांसह अन्य आठ जणांनी हिलाल माळी यांच्यावर लाठ्या, काठयांनी हल्ला केला. बेदम मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली. यात माळी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत मारेकरी पसार झाले होते. याप्रकरणी महापौर पिता,पुत्रांसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आझाद नगर पोलीस करीत आहेत.