Coronavirus : ‘कोरोना’ व्हायरसला वेगवेगळं करण्यात ‘यश’ मिळालं पुण्यातील NIV च्या शास्त्रज्ञांना, आता औषध बनवण्यावर ‘भर’

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसच्या प्रकोपादरम्यान देशभरात वेगवेगळ्या आरोग्य आणि वैज्ञानिक संस्थांमध्ये संशोधन होत असून वेगवेगळ्या राज्यात अनेक प्रकारचे संशोधन केले गेले आहे. यादरम्यान पुण्यातील नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ वायरोलॉजीच्या संशोधकांनी कोविड-१९ ला वेगळे करण्यास यश मिळवले आहे. यानंतर आवश्यक माहिती गोळा करण्याचे काम सुरु झाले आहे.

लवकरच याचे रिजल्ट देशाच्या समोर असतील, असे मानले जात आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने महामारी आणि संसर्ग आजार विभागाचे प्रमुख रमण आर. गंगाखेडेकर यांनी अगोदरच माहिती दिली होती की, NIV ने या व्हायरसला वेगळे करण्यास यश मिळवले आहे. कोणत्याही व्हायरसवर रिसर्च करण्यासाठी याला वेगळे करणे गरजेचे असते, असे सांगितले होते.

व्हायरसला रोखण्यासाठी लस तयार करण्याच्या दोन प्रमुख पद्धती असून यातील एक आहे जिनचा क्रम समजणे. यानंतर अँटीबॉडीला विकसित करण्यात यश मिळू शकते. दुसरी पद्धत आहे स्ट्रेन देणे. स्ट्रेन दिल्यानंतर लस विकसित होऊ शकते, जी सोपी पद्धत मानले जाते.

मोठ्या संख्येत चाचणीची मागणी
NIV चे संशोधक इतर माहिती गोळा करत असून ते जागतिक आरोग्य संघटनेसोबत औषध बनवण्याचे काम करतील. याअगोदर असे कधी केले गेले नव्हते. त्यांनी म्हटले की, लस बनवण्यासाठी ICMR ची प्राथमिकता प्रयत्न केलेले अणू आहेत, नवीन नाहीत. त्यांनी म्हटले की, नवीन अणूवर जास्त वेळ लागतो. पण या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आपल्याकडे जास्त वेळ नाहीये.

वैज्ञानिकांनी या आजारावर उपाय शोधण्यासाठी प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्याची मागणी केली आहे. देशातील कोरोना विषाणूचे पहिले चित्र ३० जानेवारी रोजी ट्रान्समिशन इलेक्ट्रॉनमधून NIV च्या वैज्ञानिकांनी घेतले होते. चीनमधील वुहान येथून परत आलेल्या केरळमधील रहिवाशाचा हा नमुना घेण्यात आला होता.