Aurangabad ACB Trap | 3 लाखांची लाच मागणारा पोलीस गोत्यात, एसीबीकडून FIR

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी तीन लाखाची लाच मागणी (Demand a Bribe) एका पोलीस हवालदाराला चांगलेच महागात पडलं आहे. लाच मागितल्या प्रकरणी औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Aurangabad ACB Trap) गेवराई पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदाराने 23 नोव्हेंबर 2022 रोजी लाचेची मागणी (Aurangabad ACB Trap) केली होती.

सादिक सिद्दीकी Police Constable Sadiq Siddiqui (वय-42) असे गुन्हा (FIR) दाखल करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. याबाबत 22 वर्षाच्या व्यक्तीने औरंगाबाद एसीबीकडे (Aurangabad ACB Trap) तक्रार केली होती. तक्रारदार यांच्या मामावर गेवराई पोलीस ठाण्यात (Gevrai Police Station) गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात जामीन (Bail) मिळवून देण्याकरीता व तपासात मदत करण्याकरीता पोलीस हवालदार सादिक सिद्दीकी याने तीन लाख रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी याबाबत औरंगाबाद एसीबीकडे तक्रार केली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता सादिक सिद्दीकी याने गुन्ह्यात मदत आणि जामीन मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. गुरुवारी सादिक सिद्दीकी याच्यावर गेवराई पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole),
अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे (Addl SP Vishal Khambe),
पोलीस उपअधीक्षक मारुती पंडित (DySP Maruti Pandit)
यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद एसीबीचे पोलीस उप अधीक्षक दिलीप साबळे
(DySP Dilip Sable), पोलीस अंमलदार भीमराज जीवडे, पाठक, शिंदे, बागुल यांच्या पथकाने केली.

Web Title : Aurangabad ACB Trap | Cop demanding bribe of Rs 3 lakh is in trouble, FIR from ACB

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | दरमहा 15 टक्क्याने व्याज घेणारा सावकार खंडणी विरोधी पथक-1 कडून गजाआड

Devendra Fadnavis | राज्याच्या विकासासाठी ‘पंचामृतावर’ आधारित सर्वसमावेशक अर्थसंकल्प – देवेंद्र फडणवीस

Maharashtra Budget 2023 | शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष, अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीसांकडून मोठी घोषणा

Ghe Bharari | महिलांना सक्षम बनवणारे ‘घे भरारी’चे व्यासपीठ ! आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात महिला उद्योजकांची भावना

Udyogini Pride Award | जागतिक महिला दिनी कर्तृत्ववान महिलांचा उद्योगिनी प्राईड अवार्डने सन्मान

Udyogini Pride Award | जागतिक महिला दिनी कर्तृत्ववान महिलांचा उद्योगिनी प्राईड अवार्डने सन्मान
Ajit Pawar | ‘डीजीआयपीआर’मधील 500 कोटींच्या घोटाळ्याला दाबण्याचा सरकारचा प्रयत्न ;विरोधी पक्षनेते अजित पवारांचा आरोप