औरंगाबाद जि.प.च्या ‘अध्यक्ष – उपाध्यक्ष’ निवडणूकीत ‘गोंधळ’, पुन्हा निवडणूक होणार

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगबाद जिल्हा परिषदेची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. वैधानिक पेच निर्माण झाल्याने ही निवडणूक उद्या दुपारी 2 वाजता पुन्हा होणार आहे. जि. प औरंगाबादच्या या निवडणूकीत काँग्रेसचे 6 आणि शिवसेनेचे 2 सदस्य फुटल्याचे सांगितले जात आहे.

या निवडणूकीत वैधानिक पेच निर्माण झाला आहे. आज निवडणूकीचे मतदान झाले. या दरम्यान सभागृहात एकूण 58 सदस्य उपस्थित होते, मतदानावेळी एका सदस्याने हात वर करुन पाठिंबा दर्शवला मात्र स्वाक्षरी केली नाही, त्यामुळे वैधानिक पेच निर्माण झाला आणि हा गोंधळ उडाला.

भाजपच्या जिल्हाधक्षांकडून सांगण्यात आले की शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार दवयानी पाटील दोनगावकर यांना 29 मत पडली तर आघाडीच्या उमेदवाराला 28 मते पडली, आघाडीचा आक्षेप असा आहे की सदस्याने त्यांना मतदान देण्यासाठी हात वर केला परंतु त्या मतदार सदस्याने स्वाक्षरी केली नाही. त्यामुळे बंडखोर उमेदवार दोनगावकर यांना 29 मते मिळाली. आता दोनगावकर यांना अध्यक्ष म्हणून जाहीर करावे अशी भाजपकडून करण्यात आली.

शिवसेनेच्या विद्यमान जिल्हापरिषद अध्यक्ष देवायानी यांनी बंडखोरी केल्याने महाविकासआघाडीत मोठा पेच निर्माण झाला आहे. परंतू आता हा वैधानिक पेच निर्माण झाल्यानंतर जि.प अध्यक्षपदाची, उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीला स्थगिती देण्यात आली आहे. आता ही निवडणूक उद्यावर ढकळण्यात आली असून उद्या पुन्हा निवडणूक होईल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/