भाजपला मोठा ‘धक्का’ ! औरंगाबादमध्ये पुन्हा शिवसेनेचा ‘भगवा’, काँग्रेस-राष्ट्रवादीनं घेतली ‘ही’ भूमिका

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – औरंगाबाद महापालिकेत आज उपमहापौर पदासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपला धक्का बसला आहे. कारण यात भाजपचा पराभव झाला. या निवडणुकीत शिवसनेचे राजेंद्र जंजाळ यांचा विजय झाल आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आल्यानं शिवसेनेची ताकद वाढली. यामुळे भाजपला हार पत्करावी लागली.

या निवडणुकीत शिवसेनेकडून एक, भाजपकडून एक उमेदवार आणि एमआयएमकडून एक उमेदवार रिंगणात होता. यात राजेंद्र जंजाळ यांनी 51 मतं मिळवत विजय मिळवला. भाजप पुरस्कृत उमेदवारानं 33 तर एमआयएमनं 18 मतं घेतली. राज्यात भाजप-सेनेत राजकीय संघर्ष सुरु झाल्यानंतर भाजपच्या उपमहापौरांनी आल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ही निवडणूक घेण्यात आली. यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र येत निवडणूक लढवली. त्यामुळे महाविकासआघाडीत असणाऱ्या शिवसेनेला जास्त फायदा झाला.

5 नगरसेवक निवडणुकीपासून वंचित
उपमहापौरपदाच्या या निवडणुकीसाठी उशीरा आल्यानं 5 नगरसेवकांना बाहेरच उभं करण्यात आलं. या 5 नगरसेवकांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आल्याची माहिती आहे. या उशीरा आलेल्या नगरसेवकांमध्ये एमआयएमचा एक, 3 अपक्ष आणि एका काँग्रेस नगरसेवकांचा समावेश आहे. यात शेख जफ्फर अख्तर(एमआयएम), मलके गिकुलसिंग संपतसिंग(अपक्ष), कैलास लक्ष्मण गायकवाड (अपक्ष), श्रीमती शबाना बेगम कुरेशी (अपक्ष), अफसर खान यासीन खान (काँग्रेस) यांचा समावेश आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मूगाच्या डाळीचे ‘हे’ आहेत ४ आरोग्यदायी फायदे !
डिप्रेशनची ‘ही’ ५ लक्षणे जाणून घ्या, दुर्लक्ष केल्यास जाल मरणाच्या दारात
‘हे’ फळ टिकवते तारूण्य ! नियमित सेवन केल्याने होतात ‘हे’ ११ फायदे
अन्नविषबाधा टाळण्यासाठी करा ‘हे’ ७ सोपे उपाय
चिंचेच्या पानांचे ‘हे’ आहेत ८ फायदे ! जाणून घ्या
चांगल्या आरोग्यासाठी दूध कधी प्यावे ? ‘या’ ९ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा