‘त्या’ महिलेकडे पाहून चालू रिक्षामध्ये चालकाचे ‘हस्तमैथुन’

नवीदिल्ली : वृत्तसंस्था : एका महिलेने एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी रिक्षा पकडली आणि ती रिक्षात बसून प्रवास करू लागली मात्र थोड्याच वेळात तिला रिक्षा चालकाचे कृत्य पाहून धक्का बसला.

तिने तत्काळ रिक्षा थांबवली आणि मलाड येथील पोलीस ठाण्यात धाव घेतली. कारणही तसेच होते रिक्षा चालक त्या महिलेकडे पाहून चालू रिक्षामध्ये हस्तमैथुन करत होता त्यामुळे ती महिला घाबरली आणि तिने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत त्या चालका विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी छेडछाड केल्याच्या आरोपावरून ऑटो चालका विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.  मुंबईमधील १ सप्टेंबर रोजीची ही घटना आहे.

पोलिसांनी ज्यावेळी चौकशी केली त्यावेळी एक धक्कादायक माहिती समोर आली या रिक्षा चालकाविरोधात या आधीही असे प्रकार केल्यामुळे गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत त्यामुळे या रिक्षा चालकाला पोलिसांनी तात्काळ अटक केली.

यापूर्वीही मुंबईमध्ये असे लाजिरवाणे प्रकार अनेकदा घडले आहेत जुलै 2019 मध्ये एका महिलेसमोर हस्तमैथुन केल्याच्या आरोपाखाली ऑटो रिक्षाचालकास अटक करण्यात आली होती. कांदिवली भागात ही महिला ऑटोमध्ये बसली होती, मात्र चालकाच्या या घाणेरड्या कृत्यामुळे महिलेला रिक्षातून प्रवास करणे कठीण झाले होते.

Loading...
You might also like