‘लॉकडाऊन’ घोषित झाल्यापासून पतीनं ‘अंघोळ’ करणं केलं बंद, पती थेट पोचली पोलिस ठाण्यात

बेंगळूर :  वृत्तसंस्था –  कर्नाटकच्या बेंगलुरुमधील महिलांसाठी पोलिसांनी ‘परिहार’ ही खास हेल्पलाईन सुरू केली असून त्यावर रोज महिलांच्या तक्रारी येत आहेत. नुकताच असा एक फोन आला की लॉकडाऊन सुरू झाल्यापासून त्या महिलेला समस्या होती की तिच्या नवऱ्याने आंघोळ करणे बंद केले आहे. महिलेचा आरोप होता की, २४ मार्चपासून तिच्या पतीने आंघोळ केली नाही आणि रोज सेक्सची मागणी करत आहे.

वास्तविक लॉकडाऊन दरम्यान पती-पत्नी अनेक दिवस एकत्र राहिल्यामुळे घरगुती हिंसाचाराच्या तक्रारीही वाढत आहेत. सर्व राज्यांच्या पोलिसांनी विशेष हेल्पलाईन सुरू केली आहे. ही परिस्थिती केवळ भारतातच नव्हे तर ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि अमेरिकेतही आहे ज्यांना कोरोनामुळे लॉकडाऊनचा सामना करावा लागला आहे.

बंगळुरूमधील परिहार हेल्पलाईनवर जयानगरवरून फोन आला होता. ३१ वर्षीय महिलेने सांगितले की तिच्या पतीचे किराणा दुकान आहे परंतु लॉकडाऊन झाल्यापासून दुकान बंद आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून त्यांनी आंघोळही बंद केली आहे.

त्या महिलेने पोलिस समुपदेशकांना सांगितले कि मी पतीला बर्‍याचदा समजावून सांगितले पण त्याला काही कळले नाही. या महिलेचा असा आरोप आहे कि नवरा रोज सेक्सची मागणी करतो आणि नकार दिल्यावर मारहाणही केली. या महिलेने आता कायदेशीर पर्यायांसाठी पोलिसांची मदत घेतली आहे.