Ayodhya Verdict : निकालाचं काँग्रेसकडून स्वागत, आता राजकारणासाठी रामाच्या नावाचा वापर थांबेल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या आयोध्या प्रकणाचा निकाल आज सुप्रीम कोर्टाच्या 5 सदस्यीय खंडपीठाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या ऐतिहासिक निकालाचे देशभरातून स्वागत केले जात आहे. आयोध्येतील वादग्रस्त जमीन प्रभू श्रीरामाच्या मंदिरासाठी देण्यात यावी आणि सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीसाठी मोक्याची पाच एकर जागा द्यावी असे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने म्हटलं आहे. कित्येक दशकांपासून न्यायालयात अयोध्या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. या प्रकरणी न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल दिला आहे.

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी निकालानंतर पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका मांडली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे काँग्रेसने स्वागत केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता राजकारणासाठी रामाच्या नावाचा वापर थांबेल. तसेच या निर्णयाचं काँग्रेस स्वागत करत आहे असे रणजीत सुरजेवाला यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. आम्ही राम मंदिर बांधण्याच्या बाजूने आहोत. या निर्णयाने फक्त राम मंदिर उभारणीचे दरवाजे खुले झाले नाहीत, तर राम मंदिराच्या मुद्यावरुन राजकारण करण्याचे दरवाजे बंद झाले आहेत, असे सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.

रामजन्मभूमीच्या निर्णयाचे ‘श्रेय’ कोणीही घेऊ नये –

सर्वोच्च न्यायालयाच्या आयोध्या प्रकरणी दिलेल्या निकालाचा काँग्रेस सन्मान करते. हा निकाल एक प्रकारे श्रद्धा व विश्वासाचाही सन्मान आहे. सर्व समजाघटकांनी न्यायालयाचा निकाल मान्य करून शांतता राखावी. देशातील परस्पर सौहार्द व एकतेची परंपरा जपण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. रामजन्म भूमीच्या निर्णयाचे श्रेय कोणतीही व्यक्ती, पक्ष किंवा संघटनेने घेण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही राम मंदिर बांधण्याच्या बाजूने असल्याचे सुरजेवाल यांनी म्हटले आहे.

Visit : Policenama.com