13 हजार रूपये ‘उधार’ घेवुन सुरू केली बाबा रामदेव यांनी ‘पतंजली’, आता मोठया कंपन्यांना देतेय ‘टक्कर’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   योगगुरु बाबा रामदेव सध्या बऱ्याच मोठ्या आजारांसाठी औषधे शोधत आहेत. त्यातच आता बाबा रामदेव यांची संस्था पतंजली आयुर्वेदने आज कोरोना व्हायरसवर आयुर्वेदिक औषध कोरोनिल लाँच केले आहे. तसेच यापूर्वी ग्लेनमार्क फार्मा आणि सिप्ला यांनी भारतात कोविड – 19 च्या उपचारासाठी औषधे लाँच केली आहेत. दरम्यान, पतंजलीचा हा दावा किती प्रभावी ठरेल आणि इतर कंपन्यांना किती स्पर्धा देईल, हे पाहणे आता उत्सुकतेचे आहे. रामदेव यांचा ट्रॅक रेकॉर्ड दर्शवितो की, त्यांच्यात दिग्गजांना धूळ चारण्याची क्षमता आहे. जाणून घेऊया बाबा रामदेवच्या योगगुरुपासून अ‍ॅक्टिविस्ट ते एफएमसीजी व्यवसाय बाहुबली बनण्याच्या प्रवासाबद्दल..

कधी 13 हजार रुपयांमध्ये सुरू केली होती कंपनी

मिळालेल्या माहितीनुसार 1995 मध्ये पतंजली कंपनी म्हणून नोंदणीकृत झाली. बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांनी पतंजलीची नोंदणी अवघ्या 13 हजार रुपयांत केली होती. त्यावेळी या दोघांकडे फक्त 3500 रुपये होते. कसे तरी नोंदणी फी मित्रांकडून कर्ज घेऊन भरली.

पतंजली अशी बनली FMCG ची बाहुबली

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार 2011-12 या आर्थिक वर्षात कंपनीचे उत्पन्न 453 कोटी रुपये होते आणि नफा 56 कोटी होता. 2012-13 या आर्थिक वर्षात कंपनीचे उत्पन्न वाढून 849 कोटी रुपये झाले आणि नफा 91 कोटींवर गेला. जर आपण टक्केवारीचा दृष्टीकोन पाहिला तर 6 वर्षात कंपनीच्या व्यवसायात 2231 टक्के वाढ झाली आहे. कंपनीची एकूण उलाढाल आता 453 कोटी रुपयांवरून वाढून 10561 कोटी झाली आहे.