लहान मुलांना ‘साखर’ आणि ‘मीठा’चा आहार देताना ‘या’ 7 प्रकारे घ्या काळजी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  लहान मुलांना जास्त साखरेचा आहार देणं खूप घातक ठरू शकतं, असे डॉक्टर सांगतात. मुल जेव्हा 2 वर्षापेक्षा जास्त मोठे होते, तेव्हा त्यास साखर खायला देऊ शकता. त्या आधी साखर खायला दिल्यास त्यांना कॅविटीज होण्याची शक्यता असते. या वयात त्यांना खजूर द्या. लहान मुलांना साखर आणि मीठ असलेले पदार्थ कधी द्यावेत, कधी देऊ नयेत, याबाबची माहिती मातांनी घेतली पाहिजे. यासंदर्भातील अतिशय महत्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

जास्त साखरयुक्त आहाराचे धोके

1  साखरेत कॅलरिज असल्याने जास्त साखरेचं सेवन केल्यास स्थूलता वाढण्याचा धोका लहानपणापासूनच असतो.

2  सुस्ती येते.

3  दातांना कीड लागू शकते.

मीठाच्या बाबतीत अशी घ्या काळजी

1  एक वर्ष पुर्ण झाल्यानंतर आहारात मीठाचा समावेश करण्यास हरकत नाही.

2  लहान मुलांच्या किडन्या या पूर्णपणे परिवक्व नसतात. त्यामुळे मीठामुळे किडन्याचे कार्य सुरळीत चालू राहण्यास मदत होते.

3  लहान मुलांना डिहायड्रेशन तसेच पोट फुगण्याची समस्या होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे मुल 1 वर्षाचं होईपर्यंत त्याच्या आहारात मीठाचा समावेश करू नका.

4  मुलांना मीठ नसलेला आहार दिल्यास आजारपणांपासून दूर राहता येईल.