धक्कादायक ! नामांकित बँकेचा अधिकारीच निघाला हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा मुख्य सुत्रधार, पुरवायचा ‘विदेशी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एका नामांकित बँकेत अधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या बँक अधिकारी परदेशी तरुणी पुरवत असल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईतून समोर आली आहे. बँक अधिकारीच सेक्स रॅकट चालवत असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. गन्हे शाखेने त्याला अटक केली आहे. नदीम नशीर खान (वय-26) असे अटक करण्यात आलेल्या बँक अधिकाऱ्याचे नाव आहे.

खान हा साकीनाका येथील रहिवाशी असून तो एका नामांकित बँकेत अधिकारी पदावर कार्यरत आहे. तो गेल्या चार वर्षापासून सेक्स रॅकेटमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. या सेक्स रॅकेटबाबात समजताच गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या कक्ष 7 ने पर्दाफाश केला आहे. कक्ष 7 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश तावरे यांच्या पथकाने सापळा रचून बँक अधिकारी चालवत असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

गुन्हे शाखेने खानशी संपर्क साधून त्याच्याकडे एक बनावट ग्राहक पाठवण्यात आला. ग्राहकाने परदेशी मुलीची मागणी केली. त्यावेळी खान याने 60 हजार रुपये तसेच राहण्याच्या व्यवस्थेबरोबरच अन्य बांबींसाठी आणखी 30 हजार रुपयांचा खर्च सांगितला. ग्राहकाने त्याने मागितल्याप्रमाणे पैसे दिल्यानंतर त्याने अन्य दलालासोबत फोन करून संपर्क साधत गुरुवारी दोन परदेशी महिलांना मालाडच्या नामांकित हॉटेलमध्ये बोलावून घेतले. दलाल महिलांना घेऊन आला. खानने दलाला पैसे देताच गुन्हे शाखेने खान, दलाल आणि दोन महिलांना ताब्यात घेतले.

Advt.

पोलिसांनी महिलांकडे केलेल्या चौकशीमध्ये त्या दोन महिला उझबेकिस्तान येथून दिल्लीत पर्यटक म्हणून आल्या होत्या. त्यांना पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायासाठी मुंबईत आणल्याचे सांगितले. पोलिसांनी दोन महिलांची सुटका करून खानकडे अधिक चौकशी सुरु केली आहे. त्याचा मास्टरमाईंड दिल्लीत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्याचा शोध घेतला जात आहे.