…म्हणून आई मतदान करताना अजित पवार कक्षात डोकावले

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी कॉंग्रसेचे नेते अजित पवार आपल्या कुटुंबियांसह काटेवाडी येथील मतदानकेंद्रावर मतदान करण्यासाठी गेले. त्यावेळी अजित पवार यांच्या मातोश्री मतदान करत असताना त्यांनी कक्षात डोकावताना दिसले. परंतु मतदान यंत्र बंद असल्याचे आईने सांगितल्याने निवडणूक अधिकाऱ्यांना सांगून ते आत डोकावले आणि त्याची माहिती त्यानी निवडणूक अधिकाऱ्याला दिली.

आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. राज्यात १४ मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. दरम्यान सकाळपासून दिग्गज नेत्यांचे भवितव्य मतपेटीच कैद होण्यास सुरुवात झाली. दिग्गजांनी आपल्या मतदारसंघात मतदानही केले. अजित पवारही मातोश्रींसह काटेवाडी मतदान केंद्रावर आले.

तेव्हा त्यांच्या मातोश्री मतदान करत असताना अजित पवार त्यांच्या जवळ जाऊन मतदान कक्षात डोकावताना दिसले. त्यामुळे येथे गोपनीयतेचा भंग त्यानी केला का असा सवाल निर्माण झाला होता. परंतु त्यांच्या वृद्ध मातोश्रींनी मतदान यंत्र बंद असल्याचं सांगितलं. त्यानंतर अजित पवार मतदान अधिकाऱ्यांना सांगून तिकडे गेले. आई वृद्ध असल्याने ते तातडीने तिकडे धावले. असे प्रत्यक्ष दर्शींनी सांगितले.