Baramati Lok Sabha | बारामती मतदारसंघातून उद्या सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार; प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत दोन्ही बाजूंनी होणार शक्तिप्रदर्शन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Baramati Lok Sabha | लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi-MVA) उमेदवार गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. प्रामुख्याने बारामती मतदारसंघाची निवडणुक ७ मे रोजी होणार असल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Ajit Pawar) या एकाचवेळी दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करून अर्ज दाखल करणार आहेत. विधान भवन परिसरात दोन ठिकाणी दोन्ही आघाड्यांच्यावतीने सभांचेही आयोजन करण्यात आल्याने आरोप प्रत्यारोपांच्या फैरींची जुगलबंदी रंगणार आहे. (Baramati Lok Sabha)

महाविकास आघाडीच्या बारामती मतदारसंघातील उमेदवार खासदार सुप्रिया सुळे, पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि शिरूरचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे एकाच वेळी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी साडेदहा वाजता उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर रास्तापेठेतील शांताई हॉटेल (Hotel Shantai) समोरील रस्त्यावर महाविकास आघाडीची सभा होणार आहे. यावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar NCP), प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), शिवसेनेचे नेते खासदार संजय राउत (Sanjay Raut), कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), आम आदमी पार्टीचे प्रदेशअध्यक्ष अजित फटके हे सभेत मार्गदर्शन करणार आहेत.

महायुतीच्या बारामती मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार या देखिल साडेदहा वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याप्रसंगी महायुतीचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले (Athawale Ramdas) हे प्रमुख नेते उपस्थित राहाणार आहेत. कॅम्पातील ब्लू नाईट हॉटेल जवळील चौकामध्ये (Blue Nile Hotel Chowk) त्याचसुमारास सभेचे देखिल आयोजन करण्यात आले आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने दोन्ही बाजूने जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.
प्रामुख्याने या शक्ति प्रदर्शनामध्ये राष्ट्रवादीतील फुटीनंतर दोन्ही बाजूला असलेल्या पदाधिकारी
आणि कार्यकर्त्यांचा तुल्यबळ सामना रंगणार आहे.
दोन्ही बाजूच्या व्यासपीठावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडणार असून आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांना दोन्ही शिवसेनांची रसद मिळणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjog Waghere On Shrirang Barne | संजोग वाघेरेंनी सोडले बारणेंवर टीकास्त्र, ”दहा वर्षात
एकही प्रकल्प नाही, कामगार, पर्यटन, नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले…”

Murlidhar Mohol Meet Amit Raj Thackeray | पुण्यात मनसे नेते अमित ठाकरेंच्या भेटीनंतर
मुरलीधर मोहोळ म्हणाले – ‘आत्मविश्वास आणखी वाढला, विजय अधिक सोप्पा झाला’ (Videos)

Attack On Police Officer In Pune | पुण्यात पोलिसांवरील हल्ले सुरूच; भांडण सोडवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला कानशिलात लगावली

Pune Estate Broker Arrested On Mumbai Airport | मुंबई विमानतळावर BMW कारमध्ये सापडले US बनावटीचे पिस्तूल अन् काडतुसे, पुण्यातील रिअल इस्टेट ब्रोकर तुषार काळे, सचिन पोटे, आकाश शिंदेला अटक

Shewalwadi Pune Firing Case | पुणे हादरलं, सलग दुसऱ्या दिवशी गोळीबार; ‘सिक्युरिटी एजन्सी’च्या वादातून गोळीबार