Zoom App वापरत असाल तर सावधान, पोलिसांनी दिला इशारा, ‘या’ 6 गोष्टी लक्षात ठेवा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणाचू प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक घरातूनच काम करत आहेत. ऑफिसचं काम आणि एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी सध्या झूम अ‍ॅपचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. ऑनलाईन मिटिंगसाठी हे अ‍ॅप उपयोगी आणि वापरण्यास सोपे असल्याने झूम या सॉफ्टवेअरचा जास्त प्रमाणात उपयोग होत आहे. सायबर भामट्यांनी झूम अ‍ॅप सदृश्य काही malware व फेक App बनवली आहेत. त्यामुळे हे App वापरताना सावधानता बाळगणे आवश्यक आहे, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आलं आहे. आपल्या सहकाऱ्यांसोबत ऑनलाईन मिटींग करिता वेगवेगळी सॉफ्टवेअर किंवा अ‍ॅपचा वापर केला जात आहे.

मात्र, झूम त्यामध्ये वापरायला सोपे असल्याने या सॉफ्टवेअरचा जास्त प्रमाणात उपयोग होत आहे. याचा फायदा घेत सायबर भामट्यांना झूम अ‍ॅप सदृश्य काही मालवेअर व फेक अ‍ॅप्स बनवली आहेत. तुम्ही जर ती डाऊनलोड केली तर तुमच्या सर्व मिटिंग रेकॉर्ड होतील व तुमची सर्व माहिती त्यांना मिळू शकते व तुमच्या डिव्हाईस (मोबाइल/कॉम्प्युटर) चा ताबा देखील हे सायबर भामटे घेऊ शकतात. या फेक फाइल्सची नावही पोलिसांनी दिली आहेत. नागरिकांनी झूम अ‍ॅप हे अधिकृत वेबसाईट किंवा प्ले स्टोरवरूनच डाऊनलोड करावे. शक्यतो कुठलीही Confidential माहिती अशा मिटिंगमध्ये बोलणे टाळावे किंवा संबंधित लोकांशी थेट बोलूनच त्यांना ही माहिती द्यावी. मिटिंग अ‍ॅडमिनने मिटिंगचे आयडी व पासवर्ड हे शक्यतो संबंधित व्यक्तीनांच थेट कळवावेत, तसेच हे पासवर्ड हा थोडा अवघड ठेवावा जेणेकरून एखाद्या दुसऱ्या व्यक्तीस तो समजण्यास कठीण जाईल. तसेच संबंधित मिटिंग अ‍ॅडमिन किंवा होस्टने फक्त मिटिंगच्या विषयासंबंधित व्यक्तींची रिक्वेस्ट स्विकारावी.

तुम्ही जर मीटिंग होस्ट असाल तर या बाबी लक्षात ठेवा
1. तुम्ही मिटींग सेटींग अशा प्रकारे बदल करा की तुमच्या शिवाय मिटींग मधील अन्य कोणीही व्यक्ती ती रेकॉर्ड करू शकणार नाही.
2. तुम्हाला जो Random मिटींग ID व पासवर्ड मिळेल त्याचाच शक्यतो वापर करा. तुमचा कुठलाही आयडी किंवा पासवर्ड वापरू नका.
3. मिटींगमध्ये सर्व अपेक्षित व्यक्तींनी login केल्यावर सदर मिटींग लॉक करा जेणेकरून अन्य कोणती व्यक्ती त्यात अनाहूतपणे login करू शकणार नाही.
4. मिटींग Setting अशी करा कि तुमच्या आधी व तुमच्या परवानगीशिवाय कोणी त्यात login करू शकणार नाही.
5. तुम्ही, जर काही कारणाने मिटींग सोडून जात असला किंवा मिटींग संपली असेल तर leave मिटींगचा option न वापरता end मिटींगचा option वापर करा.
6. मिटिंगची लिंक आयडी व पासवर्ड ओपन फोरमवर शेअर करू नका.